100 कोटींचं विधान अन् विमान अपघात; अहवालही सरकार धार्जिणे अजितदादांच्या अपघाताच्या चौकशीवर पांढरेंना संशय

Ajit Pawar यांच्या अपघाताच्या चौकशीची अहवालसरकार धार्जिणा असणार तत्कालीन सिंचन विभाग अभियंता विजय पांढरेंकडून शंका उपस्थित

Ajit Pawar

Ajit Pawar

100 crore statement and plane crash EX irrigation Engineer Vijay Padhare doubt Ajit Pawar accident probe : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्यानंतर या प्रकरणाची डीजीसीएकडून चौकशी करण्यात येणार आहे. मात्र हा अहवाल म्हणजे सरकार धार्जिणा असणार तसेच सिंचन घोटाळ्यामध्ये देखील न्याय मिळण्यावर देखील आता विश्वास राहिलेला नाही. असं म्हणत तत्कालीन सिंचन विभाग अभियंता विजय पांढरे यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीवर शंका उपस्थित केली आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

कोण आहेत विजय पांढरे?

विजय पांढरे हे जलसंपदा विभागाचे तत्कालीन अभियंता आहेत. त्यांनी जलसंपदा विभागातील हा मोठा घोटाळा उघडकीस आणला होता. त्यानंतर त्यांनी अनेकदा अजित पवारांवर जाहीर आरोप केले होते. तसेच त्यानंतर त्यांनी फडवीसांनी देखील अजित पवारांचा घोटाळा लपवायला मदत केली. त्याला मोदींनी देखील पाठिंबा दिला असं देखील पांढरे म्हणाले.

अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, चंद्रपूर काँग्रेसच्या गट नोंदणी वाद उच्च न्यायालयात; भाजपकडून उमेदवारही घोषित

त्यानंतर आता नुकत्याच झालेल्या अजित पवारांच्या निधनावर बोलताना ते म्हणाले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीचे काय होईल? यावर तत्कालीन सिंचन विभागाचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी व्यक्त केली. अजित पवारांचा अपघाती मृत्यू आणि सिंचन घोटाळा याबाबत बोलताना पांढरे म्हणाले की अजित पवारांना बाबतची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.

मोठी बातमी! 32 तासांच्या नरक यातनानंतर गॅस टँकर हटवला; मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी मोकळी

दरम्यान नुकतच अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यातील 100 कोटी कसे वाढले? तसेच या फाईल्स माझ्याकडे आहेत. असं विधान केलं होतं. त्यामुळे हा अपघात घडवून आणला का? अशा शंका या अपघातावर अनेकांनी शंका व्यक्त केल्या आहेत. मला मात्र याबाबत शंका वाटत नाही. दुसरीकडे या अपघात प्रकरणाची चौकशी डीजीसीए करणार आहे.

मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोडी मोकळी होणार, टोल घेऊ नका, डीसीएम शिंदेंचे आदेश

त्याचा अहवाल येईल मात्र सरकारी चौकशी अहवाल हे सरकार धार्जिणे असतात. तसेच सिंचन घोटाळ्याबाबत त्यावेळी मी राज्यपालांना दिलेलं पत्र हे अजित पवारांच्या एकट्याच्या विरोधात नव्हतं. तर जनतेच्या पैशांचा अनावश्यक खर्च होत होता त्यासाठी होतं. त्यानंतर मी आता राज्यामध्ये निर्माण होत असलेल्या सर्व महामार्गांचे इस्टिमेट मागवणार आहे. त्याचा संपूर्ण पोस्टमार्टम करणार आहे. तसेच या सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवार यांचं जरी निधन झालं असलं तरी इतरही आरोपी आहेत. त्यांचं काय होणार? याबाबत मला आता कोर्टाकडून कोणत्याही अपेक्षा नाही. कारण या बाबतच्या केसेस लढणारे वकीलच आता न्यायाधीश झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून न्यायाची काय अपेक्षा करणार? अशी खंत व्यक्त करत सिंचन विभागाचे तत्कालीन अभियंता विजय पांढरे यांनी सिंचन घोटाळा तसेच अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीवर शंका व्यक्त केली आहे.

Exit mobile version