Download App

जिल्हा बँकाकडे 112 कोटींच्या जुन्या नोटा धूळखात; आता 2000 च्या नोटा स्विकारण्याची धास्ती

112 crore old Rs 500 and Rs 1000 notes held by Zilla Bank have not been accepted by RBI : RBI ने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यापूर्वीच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे (Demonetization decisions) राज्य आणि देशभरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या (District Central Cooperative Banks) नोटा अद्याप बदलण्यात आलेल्या नाहीत. 500 आणि 1000 रुपयांच्या 112 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा राज्यातील नऊ जिल्हा बँकांसह अन्य काही राज्यांतील बॅंकात अजूनही पडून आहेत. आरबीआयने (RBI) या नोटा बदलून दिल्या नाहीत. त्यामुळे आता दोन हजाराच्या नोटा जमा कशा करायच्या? असा पेच जिल्हा बँकांसमोर आहे.

8 नोव्हेंबर 2016 रोजी मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. दुसऱ्या दिवशी देशभरातील सर्व बँका बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. 10 नोव्हेंबरला बँकां सुरू झाल्यावर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र चार दिवसांनंतर म्हणजे, 14 नोव्हेंबरला बँकांना 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी केली.

Narendra Modi in Australia : पंतप्रधान मोदी बॉस आहेत, अल्बनीज यांच्याकडून मोदींवर कौतुकाचा वर्षाव

मधल्या कालावधीत म्हणजे 10 ते 13 नोव्हेंबर या चार दिवसांत बँकांकडे 500 व 1000च्या नोटा मोठय़ा प्रमाणात जमा झाल्या होत्या. राज्यातील सर्व जिल्हा बँकांकडे मिळून अशा 2 हजार 771 कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्या.

या बॅंकेतील काहीच रक्कम आरबीआयने स्वीकारली. कोल्हापुरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने 254 कोटी रुपये भरले; मात्र 25 कोटींचा निर्णय अद्याप झालेला नाही. सांगली जिल्हा बँकेने 301 कोटी रुपये भरले; मात्र 14 कोटी 72 लाखांची रक्कम स्वीकारण्यात आलेली नाही. नाशिक जिल्हा बँकेचे 371 कोटी जमा झाले. मात्र, 21 कोटी रुपयांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्याचप्रमाणे पुणे, नागपूर, वर्धा, अमरावती, नगर व इतर जिल्ह्यांतील बँका तसेच गुजरात, तामिळनाडू आदी राज्यांतील 67 जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे मोठ्या प्रमाणात ही रोकड पडून आहे. राज्यातील नऊ बँकांच्या 111 कोटी 18 लाख नोटा अजूनही आरबीआयने बदलून दिलेल्या नाहीत.

Tags

follow us