Download App

19 व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवाची सांगता

  • Written By: Last Updated:

मुंबई : यंदाच्या 19 व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवात इराणच्या ओपन सिजन या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

२०२२ चा १९ वा थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सव १२ ते १८ डिसेंबर २०२२ या सप्ताहात पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे पार पडला. महोत्सवाचा सांगता समारंभ ‘पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव विद्या वाघमारे यांच्या उपस्थितीत पार पडला.

या महोत्सवात इराण, श्रीलंका, मलेशिया, युनायटेड स्टेट्स, बांगलादेश, मराठी, बंगाली, आसामी, कोकणी, गुजराती, पंजाबी, हिंदी, इंग्रजी अशा विविध भाषांमधील आणि देशांमधून मोठ्या प्रमाणात फिचर आणि शॉर्ट फिल्म च्या इंट्री आल्या होत्या. त्यामधून निवडक ३५ फिचर फिल्म आणि ३० लघुपटांचे प्रदर्शन या महोत्सवात करण्यात आले.

या महोत्सवात लघुपटांपैकी इराणच्या ‘ओपन सिजन’ या मोहम्मद हसानी दिग्दर्शित लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. द्वितीय पारितोषिक मयुर धामापुरकर दिग्दर्शित ‘मोगरा’ या मराठी लघुपटाला देण्यात आले. मोहम्मद अब्बासी दिग्दर्शित ‘रेड पेन’ या इराणी लघुपटाला ज्युरी चा विशेष पुरस्कार देण्यात आला. चित्रपट समीक्षक मीना कर्णिक आणि दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी ज्युरी म्हणून काम पाहिले.

Tags

follow us