Download App

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू! अजूनही लोक अडकले

Hoarding Collapse In Mumbai : आज दुपारी अचानक मुबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी

Hoarding Collapse In Mumbai : आज दुपारी अचानक मुबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावल्याने मुंबईकरांची पळापळ पाहायला मिळाली. वादळी वाऱ्यामुळे मुंबईतील दोन ठिकाणी होर्डिंग कोसळल्याच्या घटना घडल्या. मिळालेल्या माहितीनुसार, होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

तसेच या दुर्घटनास्थळी वेगाने बचावकार्य सुरू करण्यात आले असून 57 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. तर अजूनही 20 ते 30 लोकं त्यामध्ये अडकले आहे.

या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जखमींचा उपचाराचा खर्च सरकार देणार आहे तर या दुर्घटनेमध्ये मुत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये सरकारकडून देण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत 66 जण जखमी झाले आहे तर आतापर्यंत 8 जणाचा मृत्यू झाला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून घटनास्थळी अद्याप मदतकार्य जारी असल्याची माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. तर या प्रकरणात दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात कुठे किती टक्के मतदान? पहा आकडेवारी

आज दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळल्याने ही दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेच्या वेळी होर्डिंगखाली जवळपास 80 वाहन अडकल्याची माहिती समोर आली आहे.  घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली असून मदतकार्य सुरु आहे.

follow us