केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ (Modi) विस्तार होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर, खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी एकत्रित तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, या दर्शनासाठी दोघांना तब्बल 11 किमी पायपीट केल्याची माहिती आहे.
खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं, त्यासाठी 11 किलोमीटर पायी चालत प्रवास केला आहे. या दर्शनाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांचं संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात नाव असल्याने दोघांच्याही या देवदर्शनाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. तिरुपती ते तिरूमला डोंगरापर्यंत 11 किलोमीटर चालत श्रीकांत शिंदे यांच्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतलं.
ओमराजे यांचा महिनाभरापासूनच तो प्लॅन शिजला पण, बंधू मकरंदराजे निंबाळकरांचा खळबळजनक दावा
श्रीकांत शिंदे, खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह ॲड. निलेश देशमुख, चंद्रहार पाटील, खासदार ओमराजे यांचे बंधू हेही त्यांच्यासोबत होते, अशी माहिती आहे. या सर्वांनी आज सकाळीच तिरुपती बालाजीचे दर्शन घेतलं. त्यानंतर सर्वांनी विजयवाडा येथील कन्यका देवीचे दर्शन घेत देवीलाही साकडं घातलं. खासदारांनी मुंबई, पुणे, तिरुपती आणि विजयवाडा असा प्रवास केला.
पैलवान चंद्रहार पाटील यांनी याबाबत माहिती दिली असून, फोटोही शेअर केले आहेत. 25 जून रोजी तिरुपती बालाजी (आंध्रप्रदेश) येथे दर्शनासाठी रात्री 10 ते 2.30 वाजेपर्यंत 3800 पायऱ्या चढून जवळ पास 11 किलोमीटरचे अंतर चालत पार केले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह आम्ही सर्वांनी चालत जाऊन पहाटे दर्शन घेतले, अशी माहिती चंद्रहार पाटील यांनी दिली
