A large number of citizens attended the Sneha Mela : अमोल बालवडकर(Amol Balwadkar) मित्र परिवाराच्या वतीने बालेवाडी येथील हायस्ट्रीट(Balewadi Highstreet) मैदानावर आयोजित करण्यात आलेला भव्य स्नेहमेळावा प्रचंड उत्साह आणि आपुलकीच्या वातावरणात संपन्न झाला. या स्नेहमेळाव्यास बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, म्हाळुंगे, सुतारवाडी व सोमेश्वरवाडी परिसरातील सुमारे 3 ते 4 हजार नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून, आगामी निवडणुकीत आम्ही ठामपणे तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी प्रभागात आतापर्यंत मार्गी लावलेल्या विविध विकासकामांची तसेच अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, आरोग्य, स्वच्छता व नागरिकहिताच्या उपक्रमांची सविस्तर माहिती उपस्थित नागरिकांना देण्यात आली. या निमित्ताने सर्वांशी थेट संवाद साधत, आपुलकीची नाती अधिक घट्ट करण्याची संधी मिळाली.
अगोदर बाळासाहेबांना अभिवादन अन् नंतर पत्रकार परिषद, राज्याच लक्ष लागलेल्या युतीची आज घोषणा
या कार्यक्रमाला भाजपा कोथरूड उत्तर मंडलाच्या सर्व महिला पदाधिकारी, विविध आघाडींचे सदस्य, कार्यकर्ते, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, परिसरातील सोसायटीचे पदाधिकारी तसेच अमोल बालवडकर फाउंडेशनचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
