Download App

माझ्याशी खुलेआम चर्चा करा, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना पुन्हा चॅलेंज…

माझ्याशी खुलेआम चर्चा करण्याचं मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट चॅलेंज करत असल्याचं माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटंलय. आदित्य ठाकरे यांना याआधीही मुख्यमंत्री शिंदे यांना चॅलेंज दिलं होतं. आज मुंबईत आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.

छत्रपती शिवराय केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी अहमदनगर सज्ज

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, राजकीय पक्षात कटूता नाही. ज्यांनी त्यांना घडवलं त्यांच्याच पाठीत त्यांनी खंजीर खूपसलं आहे. तर मग आता त्यांच्याशी कसं वागायचं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच जे आमचे नाही झाले ते जनतेचे काय होणार आहे. हे लोकं माणूसकी सोडून वागत असल्याचं ते म्हणाले आहेत.

Raj Thackeray मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; दोन्ही नेत्यांमध्ये काय खलबतं?

काल मी खडी घोटाळ्याचा मुद्दा काढला, त्यावर उत्तर प्रदेशातील नेत्यांनी ट्विटरवर शिवीगाळ केली. महाराष्ट्र भाजपची माणसं बोलत नाहीत पण उत्तर प्रदेशातील नेते त्यावर मला शिवीगाळ करतात.
मी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देतो सर्व जनतेसमोर त्यांनी माझ्याशी चर्चा करावी, तुमची किताब खुली पण आहे आणि रिकामी पण असल्याचा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

काश्मिरात मोठी दुर्घटना ! लष्कराच्या ताफ्यातील ट्रक पेटला, चार जवान शहीद

तसेच मुंबई महापालिकेत अनेक कामे खडीमुळे रखडली आहेत. ती कामे लवकरात लवकर सुरु व्हायला हवीत. खडी नसल्यामुळे ही कामे खोळंबली असून पुढे ढकलली जात असल्याचा आरोपही त्यांना यावेळी केलाय. तसेच यावेळी बोलताना त्यांनी खारघर कार्यक्रमावरही टीका केली आहे.

सरकार आकडे का लपवत आहे. जी घटना घडली ती गंभीर आहे. क्लेकटर कोण होता त्याला वाचवण्यासाठी आकडे लपवले जात आहेत. राजकीय नेत्यांसाठी तिकडे पाणी होते. याचा कंत्राटदार कोण होता. कलेक्टर आणि कंत्राटदार यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? असा सवालही त्यांनी केला आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. राजकारणात कटूता नेमकी सुरू कुठून सुरू झाली. देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची कटुता नाही. पण जे 40 सोडून गेले ते ज्या पद्धतीने वागतात ते योग्य नाही. जे आमचे आणि उद्धव ठाकरे यांचे झाले नाही ते भाजपचे कसे होतील? असा खोचल सवाल करत त्यांना शिंदे गटाच्या आमदारांनी टोला लगावला आहे.

Tags

follow us