Download App

गद्दार सत्तार हाय हाय… विधानभवनाच्या पायर्‍यांवर विरोधकांची घोषणाबाजी

मुंबई : आपल्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकणारे शिंदे गटाचे आमदार तसेच राज्याचे कृषीमंत्री (Agriculture Minister) अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. शेतकऱ्यांविषयी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे विरोधी पक्षांकडून सत्तार यांचा निषेध करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा दहावा दिवस आहे. यावेळी विरोधकांनी सत्ताधारी पक्षातील कृषीमंत्री अब्दुल सत्तारांविरोधात घोषणाबाजी केली. असंवेदनशील कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा… गद्दार सत्तार हाय हाय… शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या अब्दुल सत्तार यांचा धिक्कार असो… अशा शब्दात सत्तार यांचा निषेध करण्यात आला.

किसानों के गद्दारोंको जुते मारो सालों को… शेतकऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… पन्नास खोके एकदम ओके… बोलाचीच कढी बोलाचिच भात जेवोनिया तृप्त कोण झाला… यंदाचा अर्थसंकल्प वाया गेला…अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

म्हात्रेंमुळे चर्चेत आलेले आमदार प्रकाश सुर्वे नेमके आहेत तरी कोण? जाणून घ्या

दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा दहावा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी केली.

बोअरवेलमध्ये पडलेल्या ‘त्या’ चिमूरड्याचे प्राण वाचवण्यात अपयश

जाणून घ्या नेमकं काय म्हणाले होते मंत्री अब्दुल सत्तार?
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे बळीराजा व्यथित होऊन आत्महत्येसारखे पाऊल उचलू लागला आहे. याच मुद्द्यावर राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त विधान केले होते. मंत्री सतार यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातल्या नुकसानग्रस्त भागांची नुकतीच पाहणी केली होती. नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीनंतर बोलताना त्यांनी शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही, तर अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करत आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होत.

Tags

follow us