Abhijat Marathi Bhasha Adhyayan Utkrushta Kendra: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता मराठी भाषेच्या अध्ययन आणि संशोधनाला चालना देण्यासाठी आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था येथे ‘अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र’ स्थापन करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.
44 वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाचा सुवर्ण पराक्रम, चीनला हरवत आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर या केंद्राच्या स्थापनेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर केंद्र सरकारने ही मागणी मान्य केल्याचं फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.
लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी…
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडिज इन क्लासिकल मराठी) स्थापन करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु होता.
मला हे… pic.twitter.com/W5zONMuqXB— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 2, 2026
या उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषेचा अभ्यास, संशोधन आणि तिच्या विविध पैलूंवर काम करण्याला संस्थात्मक बळ मिळण्याची अपेक्षा आहे. या केंद्रासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचं काम राज्य सरकारने यापूर्वीच सुरू केलं होतं. आता हा अहवाल केंद्र सरकारकडे सादर करून आवश्यक निधी मिळवण्याचा मार्गही मोकळा होणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
‘गो ग्यानेश गो’चा नारा; शबाना आझमी, नसीरुद्दीन शहा, विशाल दादलानींचीही CJP च्या आंदोलनाला हजेरी
अभिजात मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय झाल्याने महाराष्ट्रातील मराठी भाषिकांसाठी ही आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचंही फडणवीस यांनी नमूद केलं. या निर्णयाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
डेक्कन कॉलेजमध्ये हे केंद्र सुरू झाल्यानंतर मराठी भाषेच्या अभिजात स्वरूपाचा शास्त्रीय अभ्यास, संशोधन आणि त्यासंदर्भातील ज्ञाननिर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
