सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसचा भीषण अपघात; 50 विद्यार्थ्यांसह 57 जण जखमी

पुणे-बंगळुरू महामार्गावरील कराडमध्ये महाविद्यालयीन सहलीसाठी कोकणात गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात; अपघातात ५७ जण जखमी.

Untitled Design (35)

Untitled Design (35)

Accident in bus carrying students on a field trip : वार्षिक सहलीच्या निमित्तानं नाशिकच्या (Nashik) निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे असलेल्या ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी कोकणात गेले होते…सहलीला (Trip) गेलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या तोंडावर असलेला कोकण दर्शन साथीला आनंद, उत्साह आणि सोनेरी आठवणींचा प्रवास परतीच्या मार्गावर होता. मात्र पहाटेच्या वेळेस पुणे-बंगळुरू (Pune-Banglore) मार्गावरील कराड (Karad) जवळील बुवांचे वॉटर येथे त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पिंपळगाव शहरातील पालकांसह महाविद्यालय प्रशासनाची देखील धावपळ उडाली. सहलीच्या खाजगी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या रस्त्यावरील खड्ड्यात कोसळली.

Census 2027 : केंद्र सरकारची मोठी घोषणा; 2027 मध्ये दोन टप्प्यात होणार जनगणना

या अपघातात ५० विद्यार्थ्यांसह चालक, 2 शिक्षक आणि 4 आचारी असे 57 जण जखमी झाले. सुदैवानं या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. अपघातातील जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी, मंत्री आणि आमदारांकडून रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

Exit mobile version