Download App

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ; अपघातग्रस्त अनुदान योजनेचं कवच, धनंजय मुंडेंनी मानले आभार

ऊसतोड कामगारांच्या झोपडी व साहित्याला 10 हजारांचे, वैयक्तिक अपघातात उपचारासाठी 50 हजार रुपयांचं, लहान बैलजोडी मृत झाल्यास 75 हजार

  • Written By: Last Updated:

Accident Insurance Cover : सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असताना (Accident) धनंजय मुंडे यांनी लावलेल्या रोपट्याला आता फळं येताना दिसत असून, नुकत्याच राज्य शासनाने ऊसतोड कामगारांसाठी घोषित केलेल्या अपघात विमा कवचाला सानुग्रह अनुदान योजनेचे मूर्त स्वरूपात प्राप्त झालं असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून या सानुग्रह अनुदान योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असून, ऊस तोडणीच्या हंगामात कोणत्याही प्रकारच्या अपघातामध्ये ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाल्यास त्याला पाच लाखांचं कवच या योजनेतून देण्यात येणार आहे. तर, कायमचे अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

हा राजा का भिकारी; अजित पवार गटाच्या हसन मुश्रीफांची समरजितसिंह घाटगेंवर जहरी टीका

ऊसतोड कामगारांच्या झोपडी व साहित्याला 10 हजारांचे, वैयक्तिक अपघातात उपचारासाठी 50 हजार रुपयांचं, लहान बैलजोडी मृत झाल्यास 75 हजार रुपयांचे तर मोठी बैलजोडी मृत झाल्यास 1 लाख रुपयांचे कवच या सानुग्रह अनुदान योजनेतून लागू करण्यात आलं आहे. अत्यंत कमी कागदपत्रं तसंच, जिल्हा स्तरावर मंजुरीचे अधिकार दिल्याने खऱ्या अर्थाने ऊसतोड कामगारांना या योजनेचा अधिक लाभ मिळणार आहे.

आजवर ऊसतोड कामगारांची कुठं कागदावर नोंद सुद्धा नसायची. मात्र, सध्याचे कृषिमंत्री व तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला मूर्त स्वरूप मिळाले. त्याला कायमस्वरूपी निधी मिळण्याचा मार्ग सुकर झाला. महामंडळाच्या माध्यमातुन धनंजय मुंडे यांनी सुरू केलेल्या संत भगवानबाबा शासकीय वस्तीगृह योजनेतून तब्बल 82 वसतिगृहे सुरू करण्यात आली.

ऊसतोड कामगारांची नोंदणी झाली. त्यापाठोपाठ आता अत्यंत जोखमीचे काम करणाऱ्या ऊसतोड कामगार, वाहतूकदार, मुकादम तसेच कामगारांची बैलजोडी ते अगदी झोपडी व त्यातील साहित्याला अपघात व नैसर्गिक आपत्ती अपघाता मुळे होणाऱ्या नुकसानीसाठी सानुग्रह अनुदान योजना लागू केल्याने, धनंजय मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी पाहिलेले आणखी स्वप्न पूर्ण झाले आहे, असे म्हणता येईल असंही धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

 

follow us

संबंधित बातम्या