Sayaji Shinde On Sonam Wangchuk : नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी गेल्या 20 दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर उपोषणाला बसले आहे. त्यांच्या या उपोषणाला बॉलिवूडमधून देखील पाठिंबा मिळत आहे. तर आता अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सयाजी शिंदे यांनी देखील सोनम वांगचुक यांना पाठिंबा देत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. लेट्सअप मराठीशी बोलताना त्यांनी वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देत जोरदार हल्लाबोल केला आहे.
लेट्सअप मराठीला (Letsupp Marathi) दिलेल्या या मुलाखतीमध्ये बोलताना सयाजी शिंदे (Sayaji Shinde) म्हणाले की, सोनम वांगचुक देशावरती प्रेम करणारा, निसर्गावरती प्रेम करणारा आणि माणसावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. खरं तर देशाने त्यांची फार किंमत केली पाहिजे. नीट पेपरफुटी प्रकरणात जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी देखील नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे आणि जर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नसतील तर आपले पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी व्यक्त झालं पाहिजे. पंतप्रधानांनी सांगितलं पाहिजे की मंत्रिमंडळ देशातल्या लोकांसाठी आहे असं लेट्सअप मराठीशी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले. तसेच दिल्लीतील जंतर – मंतर मैदानावर सुरु असणारा आंदोलन आणखी मोठं व्हायला पाहिजे असं देखील यावेळी सयाजी शिंदे म्हणाले.
आपल्याकडे कायदे असावेत आणि जी काही सिस्टीम बरबाद झाली आहे ती ताबडतोब सुधारली पाहिजे. सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्यावरती आता प्रचंड वेगाने कारवाई झाली पाहिजे. आपल्या देशाचा आपल्या तरुणांचा आपल्या जीवाशी खेळण्याचा प्रसंग आहे.
डिझेलला पर्याय मिळाला! भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन रुळावर; जाणून घ्या, कशी चालते ‘ग्नीन’ ट्रेन
