Sonakshi Sinha On Sonam Wangchuk : नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर बेमुद्दत उपोषणाला बसले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 19 व्या दिवस असल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली आहे मात्र असं असून देखील मोदी सरकारकडून त्यांच्या उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने केंद्र सरकावर सोशल मीडियावर टीका करण्यात येत आहे. तर दुसरीकडे विरोधक देखील आता या प्रकरणावरुन मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. तर आता बॉलिवूडमधून देखील सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा मिळत आहे.
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या उपषोणाला पाठिंबा दिला आहे. तसेच जर आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही सोनाक्षी सिन्हा म्हणाली.
नेमकं काय म्हणाली सोनाक्षी सिन्हा ?
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडिओत सोनाक्षी म्हणाली की, मी यापूर्वी कधीही कोणतेही विधान केलेले नाही पण आता मी गप्प बसू शकत नाही. सोनम वांगचुक यांच्यासारखी एक प्रतिष्ठित व्यक्ती विद्यार्थ्यांसाठी 18 दिवसांपासून उपोषणावर बसली आहे आणि तरीही सगळे गप्प आहेत. आता मी आवाज उठवणार आहे. आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आपल्यालाही आपले मत मांडण्याचा अधिकार असायला हवा. मला भीती वाटत नाही असं अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा म्हणाली.
Sonakshi Sinha speaks on Sonam Wangchuk. pic.twitter.com/iDH05G1UAo
— Mohammed Zubair (@zoo_bear) July 16, 2026
9 किलो वजन घटले
सोनम वांगचुक यांच्या उपषोणाचा आज 19 वा दिवस असल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. माहितीनुसार, 18 दिवसांत त्यांचे वजन 8.9 किलोने घटून आता 57.15 किलोवर आले आहे. डॉक्टरांच्या मते, ते पूर्णपणे शुद्धीवर असले तरी या उपोषणामुळे त्यांच्या अंतर्गत अवयवांवर आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. मात्र असं असून देखील आतापर्यंत केंद्र सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्याने सोशल मीडियावर केंद्र सरकारवर जोरदार टिका होताना दिसत आहे. तसेच आता विरोधक देखील या प्रकरणात सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे.
CM फडणवीसांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी, पुढील दीड महिन्यात राज्यात मोठे फेरबदल?-
