Vinay Kumar Kantheti : 40 लाखांची लाच घेताना रायगडचे CGST अतिरिक्त आयुक्तासह तिघांना अटक

Vinay Kumar Kantheti : सीबीआयने रायगड जिल्ह्यात मोठी कारवाई करत तब्बल 40 लाखांची लाच घेताना रायगडचे CGST अतिरिक्त आयुक्त विनय कुमार कांथेती

Vinay Kumar Kantheti

Vinay Kumar Kantheti

Vinay Kumar Kantheti : सीबीआयने रायगड जिल्ह्यात मोठी कारवाई करत तब्बल 40 लाखांची लाच घेताना रायगडचे CGST अतिरिक्त आयुक्त विनय कुमार कांथेती यांना अटक केली आहे. सीबीआयच्या या कारवाईनंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून अनेक चर्चांना उधाण आले आहे. सीबीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एका दगडखाणी व्यवसायाशी संबंधित जीएसटी आणि रॉयल्टी प्रकरण निकाली काढण्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत रायगडचे CGST अतिरिक्त आयुक्त विनय कुमार कांथेती (CGST Additional Commissioner Vinay Kumar Kantheti) यांच्यासह 2009 च्या बॅचचे IRS अधिकारी अधीक्षक राकेश कुमार सिन्हा आणि कथित मध्यस्थ नरेंद्र राजपूत यांना देखील अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

रायगड (Raigad) जिल्ह्यातील एका दगड उत्खनन कंपनीचे जीएसटी (GST) आणि रॉयल्टीशी संबंधित वाद मिटवून प्रकरण बंद करण्यासाठी सीजीएसटीच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला 1 कोटी 50 लाखांची मागणी केली होती मात्र चर्चेअंती 40 लाख रुपये निश्चित करण्यात आले. तक्रादाराला सरकारी अधिकाऱ्यांनी ही रक्कम नरेंद्र राजपूत या खासगी मध्यस्थाकडे देण्याचे सांगितले. या प्रकरणात तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयने 27 ऑगस्ट रोजी सापळा रचून 40 लाख रुपयांची लाच स्वीकारताना खासगी मध्यस्थ नरेंद्र राजपूत (Narendra Rajput) याला अटक केली.

अटकेनंतर केलेल्या तपासात अधीक्षक आणि अतिरिक्त आयुक्तांचा थेट सहभाग निष्पन्न झाल्याने तसेच त्यांनी देखील लाचेची रक्कम स्वीकारल्याचे मान्य केल्यानंतर सीबीआयने (CBI) त्यांना अटक केली.

नशिबाची साथ मिळणार, आज ‘या’ राशींच्या लोकांना होणार फायदा –

तर दुसरीकडे या अटकेनंतर सीबीआयने आरोपींच्या निवासस्थानांवर आणि संबंधित ठिकाणांवर छापे मारुन 43 लाख रुपायांची रोख रक्कम आणि 90 लाख रुपये किमतीचे सोन्या – चांदीचे दागिने जप्त करत पुढील तपास सुरु केला आहे.

Exit mobile version