Aditi Tatkare Answered to NCP Sharad Pawar on Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana : राज्य सरकारची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत नेहमीच काही ना काही वाद निर्माण होत असतो. तसेच विरोधकांकडून त्यांच्यावर आक्षेप घेतला जात असतो. त्यातच आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने केलेल्या आरोपांना महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाल्या आदिती तटकरे?
दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच, इतर शासकीय योजनांचा १५०० रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे.
मायभगिनींची घोर फसवणूक करणाऱ्या राज्य सरकारवर ४२० चा फसवणुकीचा गुन्हा का दाखल करू नये?
राज्यातील ८ लाख महिलांना 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजने'अंतर्गत १००० रुपये मिळत असल्याने त्यांना मिळणारा 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेचा १५०० रुपयांचा मासिक हप्ता कमी करून फक्त ५००…
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 15, 2025
मलाही काकांचा आशीर्वाद घ्यावा लागतो; अजित पवारांनंतर रोहित पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधान
त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा १००० रुपये लाभ घेत असलेल्या ७७४१४८ महिलांना उर्वरित फरकाचे ५०० रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे.एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून, सदर प्रक्रियेत दिनांक ३ जुलै २०२४ नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट 18 एप्रिलला होणार रिलीज
दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच, इतर शासकीय योजनांचा १५०० रुपयांपेक्षा कमी… pic.twitter.com/485UFXrRiq
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) April 15, 2025
याबाबतचे स्पष्टीकरण मी स्वतः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद आहे. तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अपप्रचार करणाऱ्या विरोधकांचे एकतर प्रशासकीय आकलन कच्चे आहे, किंवा योजनेच्या देदीप्यमान यशाने त्यांचे मनोबल खचले आहे. विरोधकांच्या या अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत ही मला खात्री आहे.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने काय म्हटलं?
मायभगिनींची घोर फसवणूक करणाऱ्या राज्य सरकारवर ४२० चा फसवणुकीचा गुन्हा का दाखल करू नये? राज्यातील ८ लाख महिलांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’अंतर्गत १००० रुपये मिळत असल्याने त्यांना मिळणारा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचा १५०० रुपयांचा मासिक हप्ता कमी करून फक्त ५०० रुपये देण्याचा राज्य सरकारचा निर्णय अन्यायकारक नाही का?
निवडणुकीपूर्वी २१०० रु. चा हप्ता देऊ अशी वल्गना करणारे महायुती सरकार आज २१०० रुपये तर सोडाच, पण मासिक १५०० रुपयेही वेळेवर देत नाही. याउलट ते अजून कसे कमी होतील यासाठी नवनव्या क्लृप्त्या शोधत आहेत. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची ही घोर फसवणूक आहे.