मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथील ओबीसी एल्गार मेळाव्याला एका विशिष्ट जातीचा किंवा टोळीचा मोर्चा असे संबोधले. त्यांनी मेळाव्याचे मुख्य नेते छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले. (OBC) भुजबळ ओबीसी आरक्षणाचा केवळ ढोंग करत असून, ब्लॅकमेलिंग करून मंत्रिपदे मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा जरांगे पाटलांनी केला. त्यांचा उद्देश ओबीसी समाजाचे कल्याण नसून, मराठा-ओबीसी समाजात तणाव निर्माण करून स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे असल्याचे पाटील म्हणाले.
मराठा समाजाला राजकीय पाठिंबा देणाऱ्यांनी त्यांच्या भविष्याच्या आड येऊ नये, असं मत त्यांनी व्यक्त केलं. छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांना गोपीनाथ मुंडे यांचा वारसा चालवण्याचं आवाहन करण्यावरही त्यांनी टीका केली. भ्रष्ट आणि जेलवारी केलेल्या नेत्यांच्या हाती चांगला वारसा देऊ नये, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणासाठी ५८ लाख नोंदी झाल्या असून, अधिकाऱ्यांनी यात अडथळे आणल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठा समाज अन् आमच्यात अंतर पडल ते या दरिंदे पाटलामुळे; भुजबळांची बीडमधून जरांगेंवर टीका
घुरर्ट छगन भुजबळ यांचं चक्रव्यूह प्रचंड घातक आणि विषारी आहे, या षडयंत्रामध्ये एकदा गुंतलं की बाहेर निघता येत नाही, गोरगरीब मराठा लेकरांचं वाटुळं का करावं? असे पंकजा मुंडे यांना वाटलं असावं, यापुढे सुधारणा करू असं त्यांना वाटले असेल, त्यामुळे पकंजा मुंडे या मेळाव्याला आल्या नसतील असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. दरम्यान मनोज जरांगे पाटील माझ्या मतदारसंघात आले तरी मी निवडून आलो असा दावा शुक्रवारच्या सभेत छगन भुजबळ यांनी केला होता, त्याला देखील जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
मी जर खरच आलो असतो, तर भुजबळ यांच्या धुरा उलाल झाल्या असत्या, आता निवडून आल्यावर बोलत आहेत, पण तेव्हा तर ते मला मित्र आहे म्हणाले होते. तेव्हा म्हणाले जरांगे पाटील मित्र आहेत, आले आणि गेले. पण त्यावेळी मी एका सांत्वन भेटीला गेलो होतो. छगन भुजबळ यांची काही दिवसात वाईट अवस्था होणार आहे, तुटलेल्या चपला, केसांवर फुगे असं काही त्यांच्याकडे दिसेल, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.