Delimitation Bill : ‘डीलिमिटेशन बिल’ मंजूर होताच मोदी मंत्रिमंडळात फेरबदल; सुप्रिया सुळे केंद्रात तर जयंत पाटील राज्यात मंत्री?

Delimitation Bill : सोमवारी (30 नोव्हेंबर) रोजी मोदी सरकार लोकसभेत डिलिमिटेशन विधेयक सादर करणार आहे. या विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस

Delimitation Bill

Delimitation Bill

Delimitation Bill : सोमवारी (30 नोव्हेंबर) रोजी मोदी सरकार लोकसभेत डिलिमिटेशन विधेयक सादर करणार आहे. या विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट देखील पाठिंबा देणार असल्याने पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या विधेयकाला पाठिंबा देत असल्याने पक्षाला केंद्रात आणि राज्यात मंत्रिमंडळात वाटा मिळणार असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात तर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच याबाबत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चर्चा देखील सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, शरद पवार यांचा पक्ष (NCPSP) काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ (INDIA) आघाडीतून बाहेर पडून भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ (NDA) मध्ये सामील होण्याबाबतही चर्चा करत आहे. पक्षांतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्तेतील वाटेवाटपाबाबत सध्या महत्त्वपूर्ण वाटाघाटी सुरू आहेत. संसदेत डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्यापूर्वी दोन्ही पक्षात अंतिम चर्चा होणार आहे.

केंद्रात सुप्रिया सुळे यांच्यासाठी मंत्रिपदाची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेतृत्व लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या मंत्रिमंडळात (Union Cabinet) स्थान मिळावे, यासाठी आग्रही आहे. सुप्रिया सुळे पक्षाच्या कार्याध्यक्ष आहेत. नुकतंच  ‘इंडिया’ आघाडीद्वारे व्होट चोरी प्रकरणात करण्यात आलेल्या आंदोलनात सुप्रिया सुळे यांनी भाग घेतला होता मात्र त्यांनी डिलिमिटेशन विधेयकावर भूमिका बदली आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएत जाण्याची तयारी करत आहे.

महाराष्ट्र सरकारमध्ये दोन मंत्रिपदांची मागणी

केंद्रातील मागण्यांव्यतिरिक्त, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष महाराष्ट्रातील भाजप-नेतृत्वाखालील सरकारमध्ये दोन मंत्रिपदे मिळवण्यासाठी वाटाघाटी करत आहे. या सरकारमध्ये आधीच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट सामील आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना अर्थ खाते मिळण्याची शक्यता आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांना, मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. इतर ज्येष्ठ आमदारांना सामावून घेण्यासाठी पक्ष राज्यमंत्री (MoS) पदांच्या दोन जागांचीही मागणी करत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 8 खासदार  

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे लोकसभेत आठ खासदार आहेत. हे खासदार ‘डिलिमिटेशन’ (Delimitation) प्रक्रियेच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. ही प्रक्रिया संसदेत आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू करण्याशी संबंधित आहे, ज्याला 2023 मध्ये सर्व राजकीय पक्षांच्या पाठिंब्याने सशर्त मंजुरी मिळाली होती. पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने संकेत दिले आहेत की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटातील एका गटाचे असे मत आहे की, संसदेत या विधेयकाला अधिकृतपणे पाठिंबा देण्यापूर्वी सत्तेच्या वाटपाचे सूत्र (power-sharing formula) निश्चित केले जावे.

आज ‘या’ 5 राशींना होणार लाभ होईल; जाणून घ्या आजचे राशिभविष्य –

मोदी मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता

डिलिमिटेशन विधेयक मंजूर झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात देखील फेरबदल होणार असल्याचा दावा मीडिया अहवालात करण्यात येत आहे. 23 नोव्हेंबरच्या सुमारास मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु नंतरच्या अहवालांनुसार तो पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. मात्र, आतापर्यंत सरकारकडून मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Exit mobile version