Maratha Kranti Morcha Protest : मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीमाना दिला आहे. (Kranti Morcha) या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजीनामा देण्याची मागणी करत मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने धरणे आंदोलन केले आहे.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकांसह माजी आमदार कैलास गोरंट्याल, अभिमन्यू खोतकर यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. राज्य शासनासह मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मंत्रीपदासह आमदारकी जाणार की राहणार?, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा आज फैसला
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपद्धतीने हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला, पाहिजे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सतत आंदोलन करण्यात येतात. देशमुख यांच्या हत्या करीत असताना खिदळणारे आरोपींची छायाचित्रे सोमवारी रात्री समाजमाध्यमावंर व्हायरल झाली. ही छायाचित्रे पाहुन संतप्त सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी क्रांतीचाैक येथे जोरदार निदर्शने केली. वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे, धनंजय मुंडे हाय हाय,अजीत पवार हाय हाय, धनंजय मुंडेला अटक झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या.
यावेळी आंदोलकांनी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्या प्रतिमांना जोडे मारले आणि या प्रतिमा पायदळी तुडवून जाळून टाकल्या. या आंदोलनात प्रा. चंद्रकांत भराट, प्रा. माणिकराव शिंदे, वैभव भगत, सुनील कोटकर, ॲड. दत्ता हुड, पंढरीनाथ गोडसे, निवृत्ती डक, विजय काकडे, नितीन कदम, ज्ञानेश्वर गायकवाड, पंढरीनाथ काकडे, अतुल जाधव, सचिन हावळे,प्रा. मनीषा मराठे, रेखा वाहटुळे, कल्पना पाटील, तनुश्री चव्हाण आदींसह अन्य समाजबांधवांनी सहभाग नोंदविला.