Download App

देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले तर तुमचं वस्त्रहरण होईल; नितेश राणेंचा महाविकास आघाडीला इशारा

सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपावर नितेश राणे यांनी, 'सचिन वाझे महाविकास आघाडीचा कलेक्शन एजंट होते असं म्हणत मोठे आरोप केले.

  • Written By: Last Updated:

Nitesh Rane on Sachin Vaze : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी पुन्हा एकदा आरोप केले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचं सचिन वाझे म्हणाले आहेत. दरम्यान, त्यांनी राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांचही नाव घेतलं आहे. (Sachin Vaze ) त्यामुळे या प्रकरणाला वेगळच वळण लागल्याची शक्यता आहे. दरम्यान, यावार आता भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार घणाघात केलाय.

मुसळधार पावसाचा फटका; ताम्हिणी घाटात रस्ता एका बाजूने खचला, ५ ऑगस्टपर्यंत वाहतूक बंद

सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपावर नितेश राणे यांनी, ‘सचिन वाझे महाविकास आघाडीचा कलेक्शन एजंट होते. सचिन वाझे यांनी सत्य विधान केलंय. सत्य बोलायला सचिन वाझेंनी बोलायला सुरुवात केली आहे. अनिल देशमुख यांनी हिंमत असेल तर समोर येऊन खुलासा करावा. सगळ्या गोष्टीची खुलासा करण्याची हिंमत अनिल देशमुख यांनी करावी, असं आव्हान नितेश राणे यांनी अनिल देशमुखांना दिले आहे.

सचिन वाझे यांना दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या खुनासंदर्भातही माहिती आहे. सचिन वाझे जसं जसं बोलत जातील, तसं तसं महाविकास आघाडीचं वस्त्रहरण होईल असा थेट प्रहार राणे यांनी केला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मेळाव्याला शिवसंकल्प नाव नाही तर अली संकल्प मेळावा नाव ठेवावं असा चिमटाही राणे यांनी यावेळी ठाकरे यांना काढला. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाविकास आघाडीतील सर्वांच्या कुंडल्या आहेत. फडणवीस मैदानात उतरले तर सर्वांचं वस्त्रहरण होईल, असा इशाराही नितेश राणे यांनी यावेळी दिला आहे.

वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी काँग्रेस पक्ष १०० पेक्षा जास्त घर बांधणार; राहुल गांधींची मोठी घोषणा

सचिन वाझेंनी नेमकं काय म्हटलं?

माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. सीबीआयकडे देखील त्याचे पुरावे आहेत. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. सुनावणी त्यांच्या विरोधात गेली आहे. देवेंद्र फडणवीसांना देखील या संदर्भात मी पत्र लिहिलं आहे. मी नार्को टेस्टसाठी कधीही तयार आहे. मी एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये जयंत पाटील यांचं नाव असल्याचा गौप्यस्फोट सचिन वाझेंनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना केला आहे.

देशमुखांचा पलटवार

अनिल देशमुख म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची ही नवीन चाल आहे. मी काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे आता सचिन वाझे मार्फत माझ्यावर आरोप केले जात आहे. परंतु, सचिन वाझे गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्याच्या कोणत्याही वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. दोन खुनाच्या प्रकरणात सचिन वाझे कारागृहात आहे, असे त्यांनी म्हटलं आहे.

follow us