Download App

तीन वर्षाच्या अज्ञातवासातून दीपक सावंत शिंदेच्या गटात

  • Written By: Last Updated:

मुंबई : उद्भव ठाकरे याना आणखी एक धक्का बसला आहे. माजी मंत्री दीपक सावंत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. दीपक सावंत हे एकेकाळी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे अतिशय विश्वासू होते. बाळासाहेब ठाकरे यांचे वैद्यकीय जबाबदारी काही काळ त्यानी संभाळली होती.

त्यांनतर बाळासाहेब ठाकरे यांनी दीपक सावंत याना विधानपरिषदेवर आमदार केल. तसेच उद्धव ठाकरे यांनी सावंत याना आरोग्य मंत्री केले होते. सेना भाजप महायुतीच सरकारच्या काळात सावंत आरोग्य मंत्री होते. परंतु शेवटी एक वर्ष बाकी असताना सावंत याना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता. यानंतर सावंत यांचे पक्षातील काम देखील कमी करण्यात आले होते.

गेले तीन वर्ष अज्ञातवासात असलेल्या सावंत यांनी सुभाष देसाई आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते. मला पक्षात सक्रिय करा मला काहीतरी काम द्या हे पत्र चांगलेच गाजले होते. त्यानंतर सावंत हे राजकिय अज्ञातवासात गेले होते. त्या नंतर त्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे.

यावेळी बोलताना डॉ. दीपक सावंत यांनी आपण शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेना पक्षात सक्रियरित्या काम करायला सुरुवात केली. शिवसेनेच्या माध्यमातून पालघर येथील कुपोषणग्रस्त मुलांसाठी तसेच मेळघाटातील कुपोषण कमी करण्यासाठी काम केले. स्वर्गीय आनंद दिघे यांच्यासोबत देखील काम करण्याची संधी त्यावेळी मला मिळाली. त्यांच्यासोबत काम करतानाच एकनाथ शिंदे यांच्या कामाचा मला अंदाज आला आणि कोरोना काळात त्यांनी ज्या पद्धतीने ठाणे शहरात आरोग्य सेवा बळकट केली तसेच कमी वेळात रुग्णालये उभी केली ते पाहून प्रभावित झालो असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. मला पक्षात सक्रिय काम करण्याची इच्छा होती मात्र मला पक्षप्रमुखांनी सक्तीची व्हीआरएस दिल्याने मला थांबावे लागले. त्यानंतर मी पुन्हा पक्षाकडे काम देण्याची विनंती केली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याशी ऑनलाइन बोलताना त्यांना तशी विनंती देखील केली होती, तसेच माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना तसे पत्र देखील लिहिले होते. मात्र तरिही पक्षाने काम करण्याची संधी दिली नाही त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सक्रीय होऊन शिवसेना तळागाळात पोहचवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली, तसेच यासाठी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची एक संकल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केली असून ती राबवून राज्यातील सर्वसामान्य माणसाला पक्षाशी जोडण्याचा आपला मनोदय असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी डॉ. दीपक सावंत यांनी शिवसेनेत प्रदीर्घ काळ काम केले होते. शिवसेना भाजप युती सरकारमध्ये ते आणि मी मंत्रिमंडळात एकत्र काम केले होते. त्यांनी पालघर मध्ये कुपोषणग्रस्त मुलांसाठी केलेले काम किंवा आरोग्य मंत्री असताना टेलिमेडिसीन या संकल्पनेचा दुर्गम भागात केलेला वापर याचा मी स्वतः साक्षीदार होतो. त्यांना पक्षासाठी अधिक भरीव काम करण्याची इच्छा होती मात्र त्यापूर्वीच त्यांना सक्तीची व्हीआरएस घ्यायला लावून घरी बसवण्यात आले. डॉ. सावंत यांनी आरोग्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचा अनुभव पाहता सरकारला त्याचा नक्की फायदा होईल असे सांगत आता पुन्हा एकदा ते नव्या जोमाने पक्षात सक्रिय होतील असे सांगून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार रवींद्र फाटक,शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर, शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर, शिवसेना महिला संघटीका सौ. कला शिंदे, अंधेरी विभागप्रमुख अल्ताफ पेवेकर आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

follow us