Download App

अहिल्यानगरकरांनो दक्षता घ्या! यलो अलर्ट जारी करत प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

Ahilyanagar मध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

  • Written By: Last Updated:

Ahilyanagar Administration alert to citizens for heavy rain : अहिल्यानगर जिल्ह्यात शनिवारी 13 सप्टेंबरपासून मुसळधार पावसाला सुरूवात झालेली आहे. यामध्ये काही ठिकाणी संततधार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने नद्यांना पूर आले आहेत. गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यात आता भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक 16 व 17 सप्टेंबर 2025 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नद्यांच्या विसर्गात वाढ; पूरस्थितीचा धोका

पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

जनरेशन झीची सौंदर्याची नवी व्याख्या! अनीत पड्डा ठरली द हाऊस ऑफ लॅक्मेनेचा नवा चेहरा

सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे 7627 क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून 3155 क्युसेक, प्रवरा नदीवरील निळवंडे धरणातून 1032 क्युसेक, ओझर बंधारा 618 क्युसेक, मुळा धरणातून 1000 क्युसेक, घोड धरणातून 8000 क्युसेक, सीना धरणातून 1501 क्युसेक, कुकडी नदीवरील येडगांव धरणातून 720 क्युसेक, हंगा नदीवरील विसापूर धरणातून 110 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.

प्रशासनाकडून नागरिकांना सूचना

मेघगर्जना होत असताना झाडाखाली, टॉवर, ध्वजांचे खांब किंवा धोकादायक ठिकाणी उभे राहू नये. विद्युत उपकरणांचा वापर टाळावा.

नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी पाणीपातळी वाढल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. पाण्याने भरलेले पूल ओलांडू नयेत.

मोकळ्या जागी असल्यास गुडघ्यावर बसून डोके झाकून घ्यावे.

जनावरांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करावे व शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी नियोजन करावे.

पर्यटनासाठी धरणे, नद्या व धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये पाण्याच्या प्रवाहाजवळ जाण्याचे टाळावे.

आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री क्रमांक 1077 असून दूरध्वनी क्रमांक 0241-2323844 आणि 2356940 उपलब्ध आहेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

 

follow us