Child Marriages : एकाच दिवसात 9 बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश

Child Marriages : महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यात एका दिवसात एकूण 9 बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे.

Child Marriages

Child Marriages

Child Marriages : महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यात एका दिवसात एकूण 9 बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. या कारवाईमुळे बालविवाह प्रतिबंधाबाबत प्रशासनाची सजगता अधोरेखित झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 3 मे 2026 रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम (Sanjay Kadam) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई प्रभावीपणे राबविण्यात आली. या कारवाईत नगर शहरात 3, अकोल्यात 1, राहुरीत 1, श्रीगोंद्यात 1, पाथर्डीत 1, नेवाशात 1 आणि नगर तालुक्यात 1 असे एकूण 9 बालविवाह थांबविण्यात आले. या मोहिमेत पोलीस यंत्रणा, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका, जिल्हा बालसंरक्षण कक्ष तसेच चाइल्ड हेल्पलाइन कक्ष यांचा सक्रिय सहभाग राहिला. सर्व यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधून ही कारवाई करण्यात आली.

तामिळनाडूच्या राजकारणात नवीन स्टार पण अजूनही बहुमताच्या आकड्यापासून दुरुच; सत्तेसाठी मोठा निर्णय घेणार?

नागरिकांनीही अशा घटनांची माहिती तत्काळ प्रशासनाला द्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पत्नीच्या खुनाचा प्रयत्न..मुलाला मारहाण, भाजप मंत्र्यांच्या OSD वर पुण्यात गुन्हा दाखल…-

Exit mobile version