Ahilyanagar Bhairavnath Devsthan special Program for Adhik Mas : अहिल्यानगर तालुक्यातील आगडगाव येथील काळ भैरवनाथ देवस्थानच्या वतीने अधिकमासानिमित्त जावयांसाठी धोंडा जेवण उपक्रम राबविण्यात येणार आहे. रविवारी (ता. 17) दुपारी 12 वाजता महाआरतीनंतर उपक्रमास सुरुवात होईल, असे देवस्थान ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. अधिक मासानिमित्त अन्नदानाला विशेष महत्त्व आहे. जावयाला धोंडा जेवण देण्याची परंपरा आहे. देवस्थानाच्या वतीने अनेक वर्षांपासून असा उपक्रम राबविण्यात येतो.
‘सिस्टम’ – ताकद आणि न्याय यांची लढत; न्यायालयीन नाट्य ‘या’ दिवशी जगभर प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित!
आगडगाव व पंचक्रोशीतील रतडगाव, देवगाव, खांडके, कापूरवाडी, बुऱ्हाणनगर, कोल्हार, डमाळवाडी अशा गावांबरोबरच नगर शहर व राज्यभरातून भाविक या अन्नदानासाठी नावनोंदणी करतात. नोंदणी झाल्यानंतर लगेचच संबंधित लेक व जावयाला पाचीपोषाख दिला जातो. त्यामध्ये पैठणी, तांब्याचे ताट, निरंजन, अनारसे, बत्ताशे, जावयाला कुर्ता-पायजमा, टोपी, पंचा आदींचा समावेश आहे. देवस्थानाजवळ येऊन नाव नोंदणी करून लगेचच पाचीपोषाख ताब्यात दिला जातो.
या उपक्रमानिमित्त भाविकांना नगरहून येण्यासाठी एसटीच्या जादा बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच देवस्थानची बसही सेवेत असेल. उन्हापासून संरक्षण होण्यासाठी सावलीची व्यवस्था, स्वच्छ पाणी, प्रशस्त पार्किंग असे नियोजन करण्यात आले असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले.
साडेतीन हजार किलो आंबे
धोंडा, रस या उपक्रमासाठी साडेतीन हजार किलो आंबे खरेदी करण्यात येणार आहेत. पुरण-पोळी, धोंडा यासाठी एक हजार किलो डाळीचे नियोजन आहे. शंभर अन्नदात्यांचा समावेश करण्याचे नियोजन आहे. प्रथम नावनोंदणी करणारास प्राधान्य दिले जाणार आहे. मागील तीन वर्षांपूर्वी राबविलेल्या या उपक्रमात सुमारे २० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला होता. या वर्षीही मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहेत. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.
