व्हायरल व्हिडीओ अन् तरुणाचा मृत्यू, भिंगारमध्ये नेमकं काय घडलं? पोलीस अधीक्षकांची मोठी माहिती

Bhingar Ganesh Visarjan Death अहिल्यानगर शहरालगतच्या भिंगार उपनगरात गणेश विसर्जन मिरवणुकीला रात्री गालबोट लागले.

Bhingar Ganesh Visarjan Death

Bhingar Ganesh Visarjan Death

Ahilyanagar Bhingar Ganesh Visarjan Deepak Wagskar Death Major information from Superintendent of Police : अहिल्यानगर शहरालगतच्या भिंगार उपनगरात गणेश विसर्जन मिरवणुकीला रात्री गालबोट लागले. मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर दीपक वागसकर या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यावर आता अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांनी मोठी माहिती दिली आहे.

भिंगारमध्ये नेमकं काय घडलं? पोलीस अधीक्षकांची मोठी माहिती

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या दीपक वाघस्कर मृत्यूप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली. ते म्हणाले की, ज्या ठिकाणी सौम्य लाठीमार झाला, त्या ठिकाणी दीपक वाघस्कर उपस्थित नव्हतेच. ट्रॅक्टरवर लावण्यात आलेली ट्रॉली हलत असल्याने त्यावरील मुलांना खाली उतरवण्यासाठी त्यांच्या पायावर सौम्य लाठीमारकरण्यात आला होता.

ज्ञानेश कुमारांमागचा कर्ताकरविता कोण? केंद्रीय निवडणूक आयोगात मतभेद राज ठाकरेंचा राजीनाम्यासाठी आंदोलनाचा इशारा

लाठीमारचा व्हिडिओ व्हायरल करत दीपक वाघस्कर यांच्यावरच लाठीमार झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र दीपक वाघस्कर यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर सत्य समोर येणार आहे. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. तर दीपक वाघस्कर मृत्यूप्रकरणी भिंगार येथील तीनही गणेश मंडळांचा गणेश विसर्जन न करण्याचा निर्णय असून आज भिंगारमध्ये बंद पाळण्यात आला.

Exit mobile version