जिल्हा बँक बिनविरोधला ब्रेक? राम शिंदेंकडून कर्जत- जामखेड मधील उमेदवारांची यादी जाहीर

Ahilyanagar District bank election अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध होणार नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Untitled Design   2026 07 30T182203.984

Untitled Design 2026 07 30T182203.984

Ahilyanagar District bank election setback for unopposed Ram Shinde announces list of candidates from Karjat-Jamkhed : जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा सुरु असतांना विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी कर्जत- जामखेड मधील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध होणार नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

शिंदे नाईक संघर्ष पुन्हा पेटणार?, नवी मुंबईतील क्लस्टर योजनेवरून एकनाथ शिंदेंची मोठी खेळी

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक

1) कर्जत सोसायटी मतदार संघ उमेदवार – ज्योती प्रकाश शिंदे

2) जामखेड सोसायटी मतदार संघ उमेदवार – सचिन नवनाथ घुमरे

जनरल 7 जागा मधून :

1) महिला राखीव उमेदवार – सौ मंजुषा राजेंद्र गुंड

2) OBC राखीव उमेदवार साठी
– श्री आजीनाथ रामभाऊ हजारे

प्रा. राम शिंदे
सभापती,
महाराष्ट्र विधानपरिषद.

दरम्यान दुसरीकडे अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीची अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख असून जिल्हा बँक निवडणूक दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बिनविरोध व्हावी यासाठी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या अहिल्यानगरच्या निवासस्थानी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मंत्री शंकरराव गडाख माजी खासदार सुजय विखे यांची बैठक संपन्न झाली. मात्र जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे गुलदस्त्यात आहे.

‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ चं देशभक्तीपर गीत प्रदर्शित; सलमान-चित्रांगदाची जोडी पाहायला मिळणार

दुसरीकडे ही बैठक चर्चेत आली आहे. कारण जिल्हा बँक निवडणूक दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बिनविरोध व्हावी यासाठी गडाख यांनी मध्यस्थी करावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या विधान परिषद सभापती राम शिंदे यांनाच या बैठकीतून टाळण्यात आले आहे. त्यामुळे अगोदरच नाराज असलेल्या शिंदेंना या बैठकीत टाळल्याने पुन्हा या बैठका आणि चर्चांना नवे वळण मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Exit mobile version