Download App

अण्णा हजारे, पोपटराव पवार व राहीबाई पोपरे यांना अहिल्यानगर गौरव पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार वितरण

Ahilyanagar Gaurav Din : विचार भारती व जनसेवा फाउंडेशनच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या -त्रिजन्मशताब्दीनिमित्त अहिल्यानगर

Ahilyanagar Gaurav Din : विचार भारती व जनसेवा फाउंडेशनच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या -त्रिजन्मशताब्दीनिमित्त अहिल्यानगर गौरवदिन व पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन 29 ते 31 मे दरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे सचिव अनिल मोहिते व स्वागताध्यक्षा धनश्री विखे (Dhanashree Vikhe) यांनी दिली. या कार्यक्रमात पद्मविभूषण अण्णा हजारे (Anna Hazare) , पद्मश्री पोपटराव पवार (Popatrao Pawar) व पद्मश्री राहीबाई पोपरे (Rahibai Popre) यांना राज्यस्तरीय अहिल्यानगर गौरव पुरस्कार (Ahilyanagar Gaurav Din) जाहीर करण्यात आला आहे. 31 मे रोजी होणाऱ्या पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार असून सावेडीच्या माऊली सभागृहात संध्याकाळी 6 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देखील होत्सवाचे सचिव अनिल मोहिते व स्वागताध्यक्षा धनश्री विखे यांनी दिली.

यावेळी विचार भारतीचे सचिव सुधीर लांडगे म्हणाले की, महोत्सवानिमित्त 3 दिवस नगरकरांना विविध कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. या सोहळ्यात 29 मे रोजी शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व संत महंत, सर्व ऐतिहासिक स्थळांची ओळख करून देणारे चित्ररथांचा समावेश असणार आहे. तर 30 मे रोजी माऊली सभागृहात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते आणि महिला बाल कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर ह्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या सांस्कृतिक कार्यक्रमात स्थानिक कलाकार जिल्ह्याची ऐतिहासिक व धार्मिक महिमा नाट्य, नृत्य व गायनातून सादर करणार असल्याची माहिती यावेळी बोलताना विचार भारतीचे सचिव सुधीर लांडगे यांनी दिली. तर 31 मे रोजी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आदींच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा समारोप होणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली.

मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार; निवडणूक आयोगाची मोठी घोषणा

तर यावेळी महिला सबलीकरण काळाची गरज यावर हिंदुत्ववादी प्रवक्त्या काजल हिंदुस्तानी यांचे व्याख्यानाचे आयोजन सायंकाळी 6.30 ते 8 या वेळेत करण्यात आले आहे. तसेच रात्री 8 वाजता ‘राष्ट्र समर्थ देवी अहिल्या की पुण्यगाथा’ या हिंदी नाटिकेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महोत्सवाचे उपाध्यक्ष निखिल वारे व धनंजय जाधव, निमंत्रक बाबासाहेब वाकळे यांनी केले आहे.

follow us