अभिमानास्पद! राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेत कोपरगावची शाळा दिल्लीतील महाअंतिम फेरीत दाखल

Ahilyanagar Kopargaon च्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील एका शाळेतील संघाची यामध्ये निवड झाली आहे.

Ahilyanagar Kopargaon

Ahilyanagar Kopargaon

Ahilyanagar Kopargaon School Selected for grand finals in Delhi in National School Band Competition : 26 जानेवारी 2026 यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. देशातील अनेक राज्यांमध्ये विभागीय स्तरावर ही स्पर्धा संपन्न झाली. त्यानंतर आता 24 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रीय बालभवन येथे या स्पर्धेची महाअंतिम फेरी पार पडणार आहे. त्यासाठी देशभरातून 16 संघांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अहिल्यानगरच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील एका शाळेतील संघाची यामध्ये निवड झाली आहे.

लाडक्या बहि‍णींसाठी अदिती तटकरेंची मोठी घोषणा! म्हणाल्या या सुविधेचा लाभ घ्या…

कोपरगाव तालुक्यातील संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे संजीवनी सैनिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या विभागाचे पथक आता पश्चिम भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. दरम्यान या शाळेच्या शिक्षकांनी देशातील सर्वच विभागामध्ये अव्वल असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच या शाळेचे आणि विद्यार्थ्यांचे विश्वस्त सुमित कोल्हेंकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

साईबाबांच्या पालखीच्या प्रवासातील साई भक्तांच्या अढळ श्रद्धेवर आणि भक्तीवर आधारित , ‘पालखी’ चित्रपटाचा मुहूर्त

देशातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि एकतेची भावना निर्माण करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली होती . यामध्ये देशातील पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण या चार संघांमधील स्पर्धा पार पडल्यानंतर दिल्लीमध्ये महाअंतिम फेरीसाठी सोळा संघांची निवड झाली आहे ज्यामध्ये ब्रास बँड बॉईज ब्रास बँड गर्ल्स पाईप पॅन्ट बॉईज अँड गर्ल्स या संघांचा समावेश आहे. जे देशातील चार झोन्सचं प्रतिनिधीत्व करतील.

Exit mobile version