Maharashtra Kesri Wrestling competition : अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत (Maharashtra Kesri Wrestling competition) मॅट विभागात पृथ्वीराज मोहोळ विजयी ठरलायं. माती विभागाच्या अंतिम लढतीत सोलापुरच्या महेंद्र गायकवाड याने साकेत यादवचा पराभव केला. त्यामुळे आता पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात महाराष्ट्र केसरीसाठी लढत होणार आहे. गादी विभागात नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम फेरीची लढत झाली. या लढतीत पृथ्वीराज मोहोळ शिवराज राक्षेचा पराभव केला. या लढतीदरम्यान राक्षे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आम्हाला अंतिम निर्णय मान्य नसल्याचा पवित्रा राक्षे समर्थकांनी घेतला. पंचाच निर्णय चुकीचा असल्याचं राक्षे याने म्हटलंय. यावेळी संतप्त झालेल्या शिवराजने पंचाला लाथ मारल्याचं दिसून आलं. यावेळी पोलिसांनी हस्ततक्षेप करीत वाद मिटवला.
यावेळी माध्यमांशी बोलताना शिवराज राक्षे म्हणाला, पंचाने चुकीचा निर्णय दिलेला आहे. प्रतिस्पर्धेने डाव टाकला असेल आणि त्याचे दोन्ही खांदे टेकले असतील तर
तर कुस्ती फॉल होती, पण माझे दोन्हीही खांदे टेकलेले नाहीत. तुम्ही पुन्हा पाहू शकता. चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही. जर कुस्ती चीत झाली असेलतरच तुम्हाला निर्णय देता येतो. आमची हार आम्हाला मान्य पण एकदा फक्त रिप्लाय दाखवा, अशी मागणी शिवराजने केलीयं.