Download App

सहकार निवडणूक! विखे – थोरात एक झाले अन् खताळ एकटे पडले

Ahilyanagar Politics :  नगर जिल्ह्यातील राजकारणात विखे व थोरात हे नाव चांगलेच परिचित असून त्यांच्यामधील संघाचं देखील सर्वाना माहित आहे.

  • Written By: Last Updated:

Ahilyanagar Politics :  नगर जिल्ह्यातील राजकारणात विखे व थोरात हे नाव चांगलेच परिचित असून त्यांच्यामधील संघाचं देखील सर्वाना माहित आहे. राजकीय डावपेच आखात एकमेकांना चितपट करण्याचा एकही डाव दोघेही सोडत नाही. विधानसभा व लोकसभा निवडणूक असो की साधी ग्रामपंचायत यांच्यामधील संघर्ष हा नवा नाही. आता सहकारी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये देखील दोघांमध्ये संघर्ष पेटणार असे चित्र निर्माण झाले होते. थोरातांना विधानसभेत पराभूत करणारे आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने थोरातांना शह देण्याची रणनीती आखली. मात्र सहकार धर्म पाळत विखे  व थोरात कारखान्याच्या निवडणुकी या बिनविरोध होणार असून केवळ घोषणा बाकी आहे. मात्र या सगळ्यामध्ये विखे थोरात सोयीच्या राजकरणाप्रमाणे एक झाले व आमदार खताळ मात्र एकटेच पडले अशी चर्चा सध्या सुरु आहे.

विरोधी उमेदवार देण्यात अपयशी… सोईस्कर पीछेहाट

विधानसभा निवडणुकांनंतर थोरात-विखे या दिग्गजांच्या अधिपत्याखाली असलेल्या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुका जाहीर झाल्या. कारखान्याच्या निवडणुकांमुळे या राजकीय शत्रूंमध्ये पुन्हा एकदा घमासान होणार असे बोलले जात होते. थोरात कारखान्याच्या निवडणुकीत विखे यांनी खताळ यांच्या नेतृत्वाखाली महायुती निवडणुका लढविणार असल्याचे संकेत दिले. खताळ यांनी देखील या पार्श्वभूमीवर निवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्याची घोषणा केली. मात्र थोरात यांच्या विरोधात पॅनल तयार करून निवडणूक लढविणे अवघड असल्याचे विरोधकांच्या निदर्शनास येऊ लागले. विरोधात उमेदवार देण्यात अपयश येत असल्याचे लक्षात आल्याने खताळ यांनी देखील पीछेहाट घेतली. एका प्रसिद्धी पत्राच्या माध्यमातून सहकार चळवळीतील मूल्यांची पायमल्ली झाल्याचा आरोप करत पळवाट काढत निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले.

विखे – थोरात सेटलमेंट अन्  खताळ एकटे पडले

विखे व थोरात हे नेहमीच आपापले मतदार संघ व आपला किल्ला मजबूत ठेवतात. मात्र लोकसभेमध्ये सुजय विखेंच्या पराभवाला थोरात हे कारणीभूत ठरल्याचा राग विखेंच्या मनात होता. याचा बदला विधानसभा निवडणुकीत खताळ यांच्या माध्यमातून थोरातांचा पराभव करत मंत्री राधाकृष्ण विखेंनी घेतला. त्यांनतर साखर कारखाना निवडणुकीत विखेंनी खताळ यांना निवडणुकीसाठी पाठबळ दिले मात्र वरच्या पातळीवर पडद्यामागे वेगळ्याच गोष्टी घडल्या. राजकीय घडामोडीनंतर वरिष्ठांकडून आलेल्या आदेशामुळे विखे आणि थोरात यांच्यात एकमेकांच्या कारखान्यांमध्ये हस्तक्षेप नको अशी चर्चा रंगली. व यावरून सेटलमेंट झाल्याच्या व दोन्ही नेत्यांचे कारखाने बिनविरोध करण्यावर एकमत झाल्याच्या चर्चा रंगल्या. या चर्चांच्या माध्यमातून नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ मात्र आता कारखाना निवडणुकीत एकाकी पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

विखे थोरातांनी आपापला सहकार शाबूत राखला

अहिल्यानगर जिल्ह्याची राजकीय पायाभरणी सहकाराच्या माध्यमातून झाली आहे. सहकाराचा जिल्हा म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याची देशात ओळख आहे. सहकारबरोबरच राज्याच्या राजकारणात देखील जिल्ह्यातील नेत्यांची एक वेगळीच छाप आहे. या जिल्ह्यात सहकारातील दिग्गज नेते असून आपापला सहकार त्यांनी आपल्या माध्यमातून शाबूत राखला आहे.

भिक्षेकऱ्यांचा मृत्यू…जिल्हा रूग्णालयाचे CCTV फुटेज द्या, खासदार नीलेश लंकेंचे जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र

जिल्ह्यातील या दिग्गजांमध्ये आजी-माजी मंत्री राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात यांचा बोलबाला आहे. यंदाच्या सहकार कारखाना निवडणुकीमध्ये देखील विखे थोरात यांनी सामंज्यअस्याने आपापला गड शाबूत ठेवला आहे.

follow us