Ahilyanagar Shaken Elderly Man Attacks Colleagues Two Dead, Six Critically Injured at Old Age Home : अहिल्यानगर शहरातील विळद घाट परिसरामध्ये असलेले मातोश्री वृद्धाश्रम येथे वास्तव्यास असलेल्या एकाने आपल्याच सोबतच्या सहकाऱ्यांवर केलेल्या हल्ल्यामध्ये दोघाजणांचा जागीच मृत्यू झाला असून तर या हल्ल्यांमध्ये सहा जण गंभीर जखमी झालेले आहेत.
दरम्यान या घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलीस स्टेशन येथील पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी तातडीने दाखल होत या घटनेची तपासणी सुरू केली आहे ज्या हत्याराने दोन वृद्धांना मारहाण करण्यात आली ते देखील हस्तगत करण्यात आले असून पोलीस अधिक तपासणी करत आहे.
अंतरवालीतील व्यासपीठ का हटवलं? दुष्काळाच्या GR वरून मुंबई आंदोलनापर्यंत; जरांगे स्पष्टच बोलले
मातोश्री वृद्धाश्रम या ठिकाणी राजू घुलेनामक एका व्यक्तीने येथील वृद्धाश्रमातील काहींवर हल्ला केला या घटनेमध्ये दोघाजणांचा मृत्यू झाला आहे तर काहीजण जखमी झाले आहे जखमी वरती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून ही घटना नेमकी का घडली याची प्राथमिक चौकशी सुरू आहे चौकशी अंतिम या घटनेचा उलगडा होईल अशी माहिती पोलीस उपाधीक्षक शिरीष वमणे यांनी दिली आहे.
44 वर्षानंतर भारताला रौप्यपदक! पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये आर्मीमॅन सावन बरवालची कामगिरी
दरम्यान या मारहाणी मध्ये दोघांचा मृत्य झाला असून महकाळेश्वर बाबुराव हेणे वय वर्ष ६० व दत्तात्रेय शंकर हारके वय ८५ असे मयतांचे नाव आहे. तर यामध्ये सहा जण जखमी झाले असून गणेश छबु घोडके 60, बाळासाहेब अंबादास घाडगे 67, गोरख नारायण फुंदे – 75, साहेबराव दगडू भवर 63, लिंबराज दामोदर पिस्के 80, संतोष ब्रिंगल – 60 असे जखमींचे नाव आहे. दरम्यान मधील एक जणची नाजूक अवस्था असून त्यावर देखील उपचार सुरू आहे.
