Download App

Ahmednagar चे नामांतर ‘अहिल्यादेवी होळकरनगर’ करा; अन्यथा…; यशवंत सेनेचा इशारा

Ahmednagar Name Change : अहिल्याबाई होळकर जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर नगर करावे, याशिवाय धनगर समाजाच्या विविध प्रश्‍नांवर सहानुभूतीपुर्वक विचार करावा. फक्त राजकीय स्वार्थासाठी जयंती उत्सव सोहळ्याला उपस्थित राहून धनगर समाज बांधवांची दिशाभूल करू नये. अन्यथा भविष्यात या प्रत्येक प्रश्‍नाचा जाब विचारला जाईल. असा इशारा यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख तथा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकरनगर नामांतर कृती समितीचे समन्वयक विजय तमनर यांनी दिला आहे.

अबब! अहमदनगर जिल्हा बँकेत 12 कोटींच्या जुन्या नोटा पडून

अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, ‘जयंती सोहळ्यासाठी शासनाने शासकीय जयंती घोषित करून पन्नास लाख रूपयांचा निधी जाहीर केला. जयंती दिनी नगरचे नामांतर करावे, धनगर समाज बांधवांचा अंत बघू नये. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा ठराव सभागृहामध्ये मांडण्यात आला.

अभिनेत्री Ankita Lokhande आई होणार साडीतील पोजमध्ये लपवले बेबीबम्प

परंतु, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मीडियासमोर नामांतरापेक्षा विकास महत्त्वाचा असल्याचे सांगितले. त्यामुळे नामांतराविषयी धनगर समाज बांधवांना सरकारची भूमिका संशयास्पद वाटते. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न अजूनही सोडविलेला नाही. धनगर समाजाच्या आरक्षणावर आवाज उठविणाऱ्या माजी मंत्री महादेव जानकर, आमदार राम शिंदे, गोपीचंद पडळकर आदी नेत्यांचा भाजपकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो.

Radhakrishna Vikhe : शिर्डी ते भरवीर समृध्‍दी महामार्ग उत्‍तर महाराष्‍ट्राच्‍या विकासाचा मानबिंदू ठरेल

धनगर समाजाला अदिवासीप्रमाणे योजना लागू केल्या. परंतु, त्या योजना अजूनही कागदावरच आहे. धनगर समाजाच्या विविध प्रश्नांवर सरकारने सहानभूतीपूर्वक विचार करावा, अन्यथा भविष्यात जाब विचारला जाईल. समन्वयक सचिन डफळ, राजेंद्र तागड, गंगाधर तमनर, सचिन कोळपे, ज्ञानेश्‍वर बाचकर, दत्तात्रय खेडेकर, कांतीलाल जाडकर आदी उपस्थित हाेते. मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

Tags

follow us