अभिनेत्री ऐश्वर्या रायला सिन्नर तहसिलदारांकडून नोटीस

मुंबई : बॉलिवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. ऐश्वर्याला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. थकीत अकृषक कराचा भरणा करण्यासाठी ऐश्वर्यासह 1200 मालमत्ताधारकांना तहसीलदारांनी ही नोटीस बजावली आहे. ऐश्वर्या रायची सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात ठाणगाव जवळील आडवाडीच्या डोंगराळ भागात 1 हेक्टर 22 आर जमीन आहे. तिने त्या जमिनीचा एका वर्षाचा […]

Untitled Design (7)

Untitled Design (7)

मुंबई : बॉलिवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. ऐश्वर्याला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. थकीत अकृषक कराचा भरणा करण्यासाठी ऐश्वर्यासह 1200 मालमत्ताधारकांना तहसीलदारांनी ही नोटीस बजावली आहे.
YouTube video player
ऐश्वर्या रायची सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात ठाणगाव जवळील आडवाडीच्या डोंगराळ भागात 1 हेक्टर 22 आर जमीन आहे. तिने त्या जमिनीचा एका वर्षाचा कर भरलेला नाही. त्या वर्षभराच्या कराची 21,970 रुपयांची थकबाकी आहे. संबधीत थकबाकी भरण्यासाठी तिला नोटीस बजावण्यात आली आहे.

दरम्यान, ऐश्वर्यासोबत 1200 इतर मालमत्ता धारकांना देखील ही नोटीस पाठण्यात आली आहे. सिन्नर तहसीलला या मालमत्ताधारकांकडून वर्षाकाठी 1.11 कोटींचा महसूल अपेक्षित असून, त्यापैकी अजून 65 लाखांची वसुली बाकी आहे. मार्चअखेरपर्यंत ही करवसुली पूर्ण करायची असल्याने महसूल विभागाने हे पाऊल उचलले आहे.

नोटीस मिळाल्यापासून 10 दिवसांच्या आत ही थकबाकी न भरल्यास योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचं देखील या नोटिशीत म्हटलं आहे. या प्रकरणावर अद्याप ऐश्वर्या राय-बच्चनकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Exit mobile version