Download App

साहेबांनंतर बारामती माझ्याच पाठिशी; युगेंद्रच्या पराभवानंतर अजितदादांचा पवारांना टोला

विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी माझ्याविरोधात माझ्या पुतण्याला उभं केलं. त्यावेळी मी माझ्या भावाला निरोप पाठवला,

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar on Pawar Family : राजकारणात बारामतीच वर्षनुवर्ष वर्चस्व राहिलेलं आहे. (Ajit Pawar) सध्या या मतदार संघावर पवार कुटुंबामध्येच वर्चस्वाची लढाई सुरु आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बारामतीकर कोणासोबत आहे? याचं उत्तर लोकसभेला वेगळे आणि विधानसभेला वेगळं मिळालं. आता अजित पवार यांनी बारामती आपल्या पाठिशी असल्याचा दावा केला आहे.

उद्धव ठाकरे की राज ठाकरे; अजित पवार की एकनाथ शिंदे, रॅपीड प्रश्नांवर फडणवीसांचे फायर उत्तरं

लोकसभा निवडणुकीत आम्हाला मोठा फटका बसला होता. त्यानंतर शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. लाडकी बहीण योजनेमुळे मी म्हणणाऱ्यांना घरी बसावे लागले. राज्यात आजपर्यंत सर्वात जास्त जागा महायुतीला मिळाल्या आहेत असंही अजित पवार म्हणाले आहेत. पुणे जिल्ह्यातील लिंगाळी विविध विकास सोसायटीचे उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी माझ्याविरोधात माझ्या पुतण्याला उभं केलं. त्यावेळी मी माझ्या भावाला निरोप पाठवला, माझ्याविरोधात त्या पोराला उभं करू नको. तेव्हा त्याने ऐकलं नाही. तो म्हणाला, साहेबांच्या पाठिशी बारामती आहे. परंतु त्याला काय माहीत साहेबांच्यानंतर बारामती दादांच्या मागे उभी आहे. त्यावेळी माझ्या विरोधात सर्व खानदान प्रचारात उतरलं होते. मी मात्र शांत राहिलो. बारामती माझ्या पाठिशीच राहिली असंही अजित पवार म्हणाले आहेत.

लाडकी बहीण योजना सुरुच राहणार

अजित पवार म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजना कधीही बंद करणार नाही. विरोधक सांगत होते, 1500 रुपयांमध्ये काय होणार? परंतु चांगल्या योजना आणल्यावर काय होते, ते विरोधकांनी पाहिले आहे. आता आम्हाला दृष्ट लागू नये म्हणून आम्ही काळी बाहुली देवगिरीला बांधणार आहोत असा टोलाही त्यांनी लगावला.

बीड प्रकरणावर बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, बीडचे प्रकरण आम्ही गंभीरपणे घेतले आहे. त्यावर एसआयटी नेमली आहे. त्या प्रकरणाचे धागेदोरे कुणापर्यंत गेले तरी माफ करणार नाही. अजित पवार यांनी यावेळी शिरुरचा उल्लेख केला. त्यांनी अशोक पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले, शिरूर तालुक्यात सांगितलं आमच्याकडं या. परंतु ऐकलं नाही. माऊली कटके यांनी त्यांचा 75 हजार मतांनी पराभव केला.

follow us