मुंबई : एकीकडे शेतकऱ्याचं मोठं नूकसान तर दुसरकडे कर्माचाऱ्यांचा संप सत्ताधाऱ्यांनी सामंजसपणाची भूमिका घेऊन तोडगा काढण्याची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलीय. यावेळी अजित पवार यांनी सत्ताधारी नेत्यांच्या वादग्रस्त विधानावरही ताशेरे ओढले आहेत.
गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाण्यातील कार्यालयात दरोडा, एलईडी टीव्ही, एसी घेऊन चोरटे पसार
अजित पवार म्हणाले, आधीच शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. अशातच गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकरी वर्ग मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या फळबागा, कांदा, मोहरी, टरबूज, कापूस पिकांचं मोठ्या प्रमाणावर नूकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आडवा झाला असून नूकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तरी करा, अशी मागणी अजित पवारांनी केलीय.
तर दुसरकडे राज्यतला कर्मचारी वर्ग संपावर गेला आहे. संपावर तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही कामावर येणार नसल्याचा आक्रमक पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. अद्याप शेतकऱ्यांच्या पंचनाम्याचे कोणतेही आदेश सत्ताधारी सरकारने दिले नसून निदान शेतकऱ्यांच्या नूकसानीचे पंचनामे करण्यासाठी तरी कर्माचाऱ्यांनी कामावर यावं असं आवाहन अजित पवार यांनी आज विधानसभेत कर्मचाऱ्यांनी केलंय.
<a href=”https://letsupp.com/politics/sushma-andhare-mocks-cm-eknath-shinde-speech-in-khed-rally-25715.html”>‘सत्यापुढे अधिक शहाणपण चालत नाही, सुषमा अंधारेंची खेडमधल्या सभेवर खोचक टीका
तसेच कर्माचारी संप आणि शेतकऱ्यांचं नूकसान त्यामुळे सत्ताधाऱ्यांना कात्रीत पकडण्याचं काम आंदोलक करत असून अशावेळी सरकारने सामंजसपणाची भूमिका घेतली पाहिजे, असं मतही त्यांनी अजित पवारांनी व्यक्त केलंय. राज्यात सत्ताधारी कात्रीत असताना सत्ताधारी सरकारचे नेते आमदार संजय गायकवाड वादग्रस्त विधान करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
राज्यातल्या 95 टक्के कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई असल्याचं वादग्रस्त विधान संजय गायकवाड यांच्याकडून केलं गेलंय. सर्वांनाच तुम्ही एका मोजमापामध्ये कस काय धरत असल्याचा सवाल अजित पवारांनी यावेळी उपस्थित केला आहे.
दरम्यान, सत्ताधारी सरकारने गांभीर्य लक्षात घेत शेतकरी आणि कर्मचारी वर्गासाठी सामंजसपणाची भूमिका घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय.