गौतमीवर अजितदादा म्हणाले…सगळ्यांना पाहता येईल असं काम करावे

Ajit Pawar On Gautami Patil : तरुणाईच्या गळ्याची ताईत बनलेली नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) ही तिच्या अनोख्या डान्समुळे प्रसिद्ध आहे. मात्र अनेकदा तिच्या डान्सवर आक्षेप घेण्यात देखील आला. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांनी गौतमीला झापले होते. आता पुन्हा एकदा यात्रेचा विषय निघाला तेव्हा अजित पवार यांनी याच मुद्द्यावरून गौतमीवर पुन्हा […]

Untitled Design   2023 04 25T184736.580

Untitled Design 2023 04 25T184736.580

Ajit Pawar On Gautami Patil : तरुणाईच्या गळ्याची ताईत बनलेली नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) ही तिच्या अनोख्या डान्समुळे प्रसिद्ध आहे. मात्र अनेकदा तिच्या डान्सवर आक्षेप घेण्यात देखील आला. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांनी गौतमीला झापले होते. आता पुन्हा एकदा यात्रेचा विषय निघाला तेव्हा अजित पवार यांनी याच मुद्द्यावरून गौतमीवर पुन्हा एकदा भाष्य केले. सगळ्यांना पाहता येईल असं काम आपण करावे असा सल्ला पवार यांनी गौतमीला दिला आहे.

अल्पावधीत तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालेली लावणी नृत्य कलाकार गौतमी पाटील ही सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. दरम्यान अनेकदा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना विरोध झाला आहे. गौतमी नृत्य करताना अश्लील हावभाव करत असल्यानं तिच्यावर टीका होत असते. गौतमी पाटीलच्या अनेक कार्यक्रमांमध्ये गोंधळ उडाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यामुळे अनेकदा तिचे कार्यक्रम रद्द देखील करण्यात आले आहे.

दरम्यान यापूर्वी आमदार अजित पवार यांनी गौतमीच्या नृत्यावरून तिच्यावर टीका केली होती. आता पुन्हा एकदा पवार एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना यात्रेचा विषय निघाला. तर यावर बोलताना अजित पवार म्हणाले, यात्रेत तमाशात त्या पाटीलबाईंना बोलवायचं. कोण ती? गौतमी… असे म्हंटल्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. पुढे बोलताना पवार म्हणाले, लोकांना, सगळ्यांना पाहता येईल असे काम सगळ्यांनी करावे, असा सल्ला यावेळी पवार यांनी नृत्यांगना गौतमी पाटील हिला दिला आहे.

गौतमीने मागितली होती माफी
गौतमी म्हणाली, दादा मोठे आहेत, मी काही बोलू शकत नाही. दादांना माझं एकच म्हणणं आहे की, मी चुकले, तेव्हा माफी मागितली होती. माझ्याकडून चुका झाल्या होत्या म्हणून मी माफी देखील मागितली मात्र तरीही काहींकडून मला ट्रोल केलं जातंय. ते कोण हे मला माहिती नाहीये”, असं म्हणत तिने माफी मागितली होती.

Exit mobile version