Maharashtra political Crisis : …असा निकाल येऊ शकतो, अजित पवारांनी व्यक्त केली शक्यता

Ajit Pawar on Maharashtra political Crisis : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा तिढा आज 11 एप्रिल सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोडवणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयात उद्या सकाळी 10:30 वाजल्यापासून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud)निकालपत्राचे वाचन […]

Ajit Pawar Eknath Shinde

Ajit Pawar will be a chief minister replace by Eknath Shinde said Prithviraj chavan

Ajit Pawar on Maharashtra political Crisis : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा तिढा आज 11 एप्रिल सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोडवणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयात उद्या सकाळी 10:30 वाजल्यापासून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud)निकालपत्राचे वाचन करणार आहेत.

या सत्तासंघर्षावर राज्यातील विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले की, ‘जोपर्यंत त्यांच्याकडे 145 हा बहुमताचा आकडा आहे. तोपर्यंत या सरकारला धोका आहे. असं म्हणता येणार नाही. आपण सर्वजण या निकालाची वाट पाहत आहोत. त्यामुळे हा निकाल काय येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.’ असं अजित पवार म्हणाले.

Maharashtra political Crisis : सत्तासंर्षाच्या निकाला दरम्यान नरहरी झिरवळ नॉटरिचेबल!

तसेच पुढे पवार म्हणाले, अनेकांनी या सरकारवर आरोप केले आहेत. मात्र तरी त्यांनी अर्थसंकल्प सादर केला. ते सरकार चालवतात, निर्णय घेतात. त्यामुळे लोकशाहीमध्ये बहुमताने जे अधिकार मिळतात ते सर्व या अधिकारांचा ते पुरेपुर वापर करत आहेत. हे आपण गेले 11 महिने पाहत आलो आहोत.

यावेळी अजित पवार यांनी या सत्तासंघर्षांच्या निकालाबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं ते म्हणाले की, हा विधीमंडळातील मुद्दा असल्याने सर्वोच्च न्यायालय याचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी म्हणजे राहुल नार्वेकरांनी घ्यावा असा निकाल देऊ शकत. अशी शक्यता अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version