अजितदादांच्या विमान अपघाताच्या दोन दिवसांपूर्वी ट्विट अन्…; रोहित पवाराचं मोठा गौप्यस्फोट

Rohit Pawar On Ajit Pawar Death : दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद

Rohit Pawar On Ajit Pawar Death

Rohit Pawar On Ajit Pawar Death

Rohit Pawar On Ajit Pawar Death : दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत दादांच्या अपघाताच्या दोन दिवसांपूर्वी राज्यात मोठं काहीतरी घडणार होतं असं ट्विट करण्यात आलं होते असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, मी अजितदादांच्या घातपातीचा मुद्दा मांडतोय पण मला भाजपकडून (BJP) ट्रोल करण्यात येत आहे. समित ठक्कर (Sameet Thakkar) नावाचा व्यक्ती आहे तो मला ट्रोल करत आहे. त्यानेच 28 फेब्रुवारीच्या अपघाताच्या 2 दिवस आधीच एक ट्विट केले होते. राज्यात एक अशी घटना घडणार आहे ज्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप येणार असं या ट्विटमध्ये म्हटलं होते. मात्र काही वेळात त्याने हे ट्विट डिलीट केले होते. त्यामुळे मला ट्रोल करणाऱ्यांबाबत लोकांना संशय यायला लागला आहे असं या पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले. रोहित पवार यांनी केलेल्या या दाव्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

तर दुसरीकडे या पत्रकार परिषदेत बोलताना व्हीएसआर (VSR) कंपनीवर कारवाई का? होत नाही असा प्रश्न देखील उपस्थितीत केला आहे. यावेळी रोहित पवार म्हणाले की, अपघातग्रस्त व्हीएसआर कंपनीवर कारवाई का होत नाही याचा शोध आम्ही घेतला आहे. तेव्हा आम्हाला माहिती मिळाली की, व्हिएसआर कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नात आपल्या राज्याचे सत्ताधारी नेते गेले होते. या लग्नात कोण कोण गेले होते याचे फोटो देखील आमच्याकडे आहेत. व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंगच्या मुलाच्या लग्नासाठी आंध्र प्रदेशच्या टीडीपी पक्षाचे प्रमुख नेतेही गेले होते. सत्तेतले बरेच नेते व्हिएसआर कंपनीतील मालकाशी निगडीत आहेत. ज्या कंपनीच्या माध्यमातून हा विमान अपघात झाला त्याचा मालक आज भारतात नाही. व्हिएसआर कंपनीला मुद्दामाहून वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजितदादा गेले याचे दु:ख सत्तेतला माणसांना नाही परंतु व्हिएसआर मालकाला वाचवण्याची धडपड सुरु आहे असा दावा देखील या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

तर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मृत्यू प्रकरणात खोटी कागदपत्र तयार करण्याचं काम विमान कंपनीकडून करण्यात येत असल्याचा दावा देखील रोहित पवार यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. कंपनीकडून खोटी कागदपत्र तयार करण्यात येत असल्याचा दावा करत आता रोहित पवार यांनी डिजिटल कागदपत्रं हवीत अशी मागणी केली आहे.

Exit mobile version