बारसू रिफायनरी मुद्द्यावरुन राज्यात चांगलच राजकारण तापलेलं असतानाच आता अजित पवारांनी यावर मोठं विधान केलंय. वेळ पडल्यास मी स्वत: बारसूमध्ये जाणार असल्याचं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. अजित पवारांनी मुंबईतून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
पालघर प्रकरणाचा तपास सीबीआय करणार, राज सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती
अजित पवार म्हणाले, प्रकल्प करीत असताना त्याचा निसर्गावर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता राज्य सरकारने घ्यावी, तसेच पर्यावरणाचा कोणताही ऱ्हास या प्रकल्पामुळे व्हायला नको. या प्रकल्पामुळे फायदा होणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस विकासाच्या बाजूने भूमिका मांडणार असल्याचं ठामपणे अजित पवारांनी सांगितलं आहे.
आता खुपणार नाही टोचणार; ‘खुपते तिथे गुप्ते शो’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
तसेच आंदोलकांचा विरोध कशासाठी हे समजून घ्या, फायदा होणार असेल प्रकल्पाबाबत आंदोलकांनी समजून घेतलं पाहिजे, राज्य सरकारने आंदोलकांनशी चर्चा करुन गैरसमज दूर केले पाहिजेत, स्थानिकांशी चर्चा करुनच प्रकल्प करावेत, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय.
त्याचप्रमाणे प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार हे निश्चित आहे, यासंदर्भात माझी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून वेळ पडली तर बारसूमध्ये जाणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत ज्या त्या पक्षाची वेगळी भूमिका असू शकते, ठाकरे गटाचे संजय राऊत आणि राजन साळवी यांची भूमिका वेगळी आहे, मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस कायम विकासाच्या बाजूने भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.