Download App

शिंदे-फडणवीस सरकारचं ‘हम करे सो कायदा’, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अजित पवार आक्रमक…

Ajit Pawar News : नूकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत, शिंदे-फडणवीस सरकारचं हम करे सो कायदा असं चाललं असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला असून अद्याप शासनाकडून कोणतीही मदत शेतकऱ्यांनी मिळाली नसल्याने अजित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहेत.

Pune Loksabha By Election : पुणे लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत दुमत पण…

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नूकसानीचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. अशातच राज्यातील कापूस उत्पादकांना धक्का दिला आहे. कापूस उत्पादकांना भाव पाडून मागत आहेत. हा शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Pooja Batra: ‘हिने खरंच काही घातलं नाही का’? स्विमिंग पूलमधील पूजा बत्राचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

तसेच अचानक येणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नूकसान झालं आहे. शेतकऱ्याला पुन्हा उभ करायचं असेल तर राज्य सरकारने अनूकूल असायला हवं, असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

राम सातपुते आता सुधीर मुनगंटीवारांच्या विरोधात? ‘त्या’ कथित पत्राने उडवली खळबळ

दरम्यान, सध्या हवामान खात्याच्या इशाऱ्यानूसार पाऊस नसून पाऊस कधीही येत आहे. मे महिना असो किंवा जून महिन्यात अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नूकसान होतंय अन् ‘सरकारचं हम करे सो कायदा’ असं चाललं असल्याची टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केलीय.

बिहारमध्ये 1700 कोटी खर्चून गंगा नदीवर बांधला जाणारा पूल कोसळला, VIDEO व्हायरल

पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी शेतकऱ्यांसह विविध मुद्द्यांवर भाष्य करीत सत्ताधारी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार जाहिरातबाजीवर शेकडो रुपये खर्च करुन महाराष्ट्राला फसवण्याचा धंदा करत असल्याचा आरोपही अजित पवारांनी केला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने शासन आपल्या दारी उपक्रम सुरु केलाय. शासनाने न घेतलेले निर्णय या जाहिरातबाजीतून दाखवले जात असल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला आहे. यावेळी अजित पवार यांनी उदाहरण देऊनच शिंदे-फडणवीस सरकारकडे बोट दाखवलं आहे.

तसेच त्यांनी पोटनिवडणुकीवरही भाष्य केलंय. पुणे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये वेगळं मत आहे, त्यावर आम्ही चर्चा करुन मार्ग काढणार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीआधीच पुणे लोकसभा आणि चंद्रपूर लोकसभेची पोटनिवडणुक लागण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

Tags

follow us