Download App

‘नपुंसक’वरुन अजित पवारांनी शिंदे-फडणवीसांना सुनावले

  • Written By: Last Updated:

नाशिक : हिंदू जन आक्रोश रॅली प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जोसेफ यांनी महाराष्ट्र सरकारवर संताप व्यक्त केला आणि सरकार नपुंसक असून काहीही करत नसल्याचे त्यांनी म्हटले. यानंतर राज्यातील विरोधकांकडून राज्यसरकारच्या कारभारावर टीका केली जात आहे. यातच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यसरकारच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले सर्वोच्य न्यायालयाने राज्य सरकारला नपुंसक म्हणणे म्हणजे हा महाराष्ट्राचा अपमान आहे.

मुंबईत काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चाबद्दल सांगण्यात येत आहे. ‘सेपरेट फ्रॉम बॉडी’ या कायद्याची माहिती वकील विष्णू शंकर जैन यांनी न्यायालयाला दिली. त्यावर बोलताना न्या. जोसेफ म्हणाले की, द्वेषयुक्त भाषण आणि विधाने हे दुष्टचक्र आहे. त्यातून बाहेर पडणे कठीण आहे. कोणी काही बोलले की लगेच इतर लोक त्यावर प्रतिक्रिया देतात. या सर्व बेजबाबदार चर्चा आणि वक्तव्ये थांबवण्यासाठी सरकारने कारवाई सुरू करायला हवी होती, पण राज्य सरकार काहीच करत नाही. त्यामुळेच हे सर्व घडत आहे.

Shiv Thakare : शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा ‘तो’ किस्सा 

याबाबत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, “काल सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नपुंसक म्हणणे हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? हा राज्य सरकारचा कमीपणा नाही का? आम्ही कित्येक दिवसापासून तेच सांगत आहोत की राज्य सरकारची सत्ता संघर्षची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. अदयाप त्यावर निकाल आलेला नाही. आम्ही जर त्यावर बोललो तर सरकारमधील प्रमुखांना वाईट वाटेल. आता छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्यातील सरकारला नपुंसक म्हणतंय हा राज्याचा अपमान आहे. या सरकारचा कारभार कशा प्रकारे चालतोय कुणास ठाऊक. दोष कोणाला द्यायचा, त्याच आत्मपरीक्षण त्यांनी करावं.’

Tags

follow us