Download App

माझ्याकडून राजकीय धोका असू शकतो, जिवीताला नाही; ‘त्या’ तक्रारीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण

  • Written By: Last Updated:

माझ्याकडून एखाद्या व्यक्तीला राजकीय धोका असू शकतो, जिवीताचा नाही. असं स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज बोलताना दिल. दरम्यान अजित पवार (ajit pawar) यांच्या विरोधात पुण्यामध्ये पोलिसात पुणे भाजप नेत्याकडून तक्रार देण्यात आली आहे. अजित पवारांकडून माझ्या जीवाला धोका असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. ही तक्रार शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजपचे अध्यक्ष रवींद्र साळगावकर यांनी खडक पोलीस ठाण्यात दिली आहे.

अजित पवार यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पत्रकारांनी त्यावर विचारलं असता अजित पवार यांनी त्यावर उत्तर दिलं. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की माझ्या विरोधात ज्या व्यक्तीने तक्रार दिली आहे, त्या व्यक्तीला राज्य सरकारने संरक्षण द्याव. पण माझ्याकडून एखाद्या व्यक्तीला राजकीय धोका असू शकतो, जीविताचा नाही.

गणेश खिंड परिसरातील मोकळ्या प्लॉट संदर्भात मोजणी न करण्याचे न्यायालयाचे आदेश असताना त्या ठिकाणी जबरदस्तीने मोजणी केली जात आहे. सदर प्लॉटच्या ताबा असल्याने सतत धमक्या येत आहेत. याबाबत ही तक्रार देण्यात आली असून पवार यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे साळगावकरांनी तक्रारीत म्हटले आहे.

गणेश खिंड परिसरातील मोकळ्या जागेसंदर्भात तहसील कार्यालयातून या प्लॉटच्या संदर्भात पवार यांच्या नावाची चिठ्ठी लावली होती. तरी देखील तहसील कार्यालयातून साळगावकर यांना उडवाउडवीचे उत्तरे दिली जात आहेत. या प्रकरणासंदर्भात साळगावकरांनी पवारांच्या विरोधात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी अर्ज स्वीकारला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Narhari Zirwal : पांढरा सदरा, गांधी टोपी आणि हिरवं लुगडं; जपान दौऱ्यापूर्वीचा झिरवळांचा लूक चर्चेत

Tags

follow us