Download App

‘त्यात आमचा दोष काय?’, बाबा आढावांसमोरच EVM वर अजितदादांचे स्पष्टीकरण

Ajit Pawar On Baba Adhav :  नुकतंच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar On Baba Adhav :  नुकतंच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्यामुळे राज्यात दुसऱ्यांदा महायुतीची (Mahayuti) सरकार स्थापन होणार आहे.

तर दुसरीकडे निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएममध्ये (EVM) घोळ असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे ईव्हीएम विरोधात पुण्यात ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव (Baba Adhav) यांनी आत्मक्लेष आंदोलन पुकारले आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस होता. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आज अजित पवार (Ajit Pawar) यांनी आंदोलनस्थळी भेट देत आपली भूमिका मांडली.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती विरोधात लोकांनी निकाल दिला होता त्यावेळी ईव्हीएमवर कोणीही आक्षेप घेतले नाही आणि यावेळी जनतेने मतदान केले आहे, त्यांना कोण काय बोलणार? 1999 मध्ये लोकसभा निवडणुकीत मतदारांनी वाजपेयींना मतदान केले होते आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला मतदान केले होते. असं यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, आज काॅंग्रेसवाले म्हणातात की, ईव्हीएममुळे पराभव झाला परंतु त्यांनी ते सिद्ध करुन दाखवावं. नाना पाटोले म्हणतात की, संध्याकाळी मतदान कसे वाढले. त्यात आमचा काय दोष आहे? मतदान लोकांनी कधी करावे हा त्यांचा अधिकार आहे. असं देखील अजित पवार म्हणाले.

तसेच कर्नाटकामध्ये काँग्रेसने आणि पंजाबमध्ये ‘आप’ने  फुकट योजना दिले आहे. लोकशाहीमध्ये  निवडून आलेल्या सरकारने काय द्यावं, हा त्यांचा अधिकार आहे. आपल्याकडे देखील  संजय गांधीसारख्या योजना सुरु आहेत. असं असेही अजित पवार म्हणाले.

जुन्या वादातून नगर शहरात 20 वर्षीय मुलाची हत्या, आरोपी फरार

तर दुसरीकडे बाबा आढाव यांनी आत्मक्लेष आंदोलनामध्ये बोलताना विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करण्यात आले असल्याचा आरोप केला. तसेच धानसभा निवडणुकीची प्रक्रिया ज्या पद्धतीने राबवली त्यावरुन माझ्यासारख्या सुजान नागरीकाला हे पटत नाही असं देखील बाबा आढाव म्हणाले होते.

follow us