Download App

Ambadas Danve : इम्तियाज जलील यांची खासदारकी रद्द करा! दानवेंनी मागणी, नामांतराचा वाद पेटणार?

  • Written By: Last Updated:

Ambadas Danve On Imtiaz Jaleel : “औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या इम्तियाज जलील यांचं सदस्यत्व रद्द केलं पाहिजे, त्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांचं संसदेचं सदस्यत्व रद्द करा” अशी मागणी ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली आहे. औरंगाबाद शहराच छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) असं नामांतर झालं आहे. या नामांतराला विरोध करण्यासाठी खासदार जलील (Imtiaz Jaleel) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे. त्यावर बोलताना अंबादास दानवे यांनी हि मागणी केली.

यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, “इम्तियाज जलील हे औरंगजेबचा उदोउदो करतात. त्याचं उदात्तीकरण करतात. औरंगजेब हा देशद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही होता. देशद्रोही औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या इम्तियाज जलील यांचं सदस्यत्व रद्द केलं पाहिजे.”

हेही वाचा : Adani Share Price : अदानीच्या शेअर्सच्या किंमतीत वाढ, LIC चे काय झाले ?

जलील यांनी खासदार झाल्यांनतर शपथ घेतलेली असते, पण औरंगजेब हा देशद्रोही होता. त्याच समर्थन करणाऱ्या जलील यांना संसद सदस्य राहण्याचा अधिकार नाही, त्यामुळे इम्तियाज जलील यांचे संसद सदस्यत्व रद्द केले पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या छत्रपती संभाजीनगर या नामांतराल विरोध केला आहे. यावरुन राज्यातील शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी जलील यांच्यावर निशाणा साधला आहे. जलील हे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत आहेत, असा सत्तार म्हणाले आहेत. तसेच हा निर्णय कोणत्याही एका व्यक्तीचा नसून हा सरकारचा निर्णय असल्याचे सत्तार म्हणाले आहेत.

हेही वाचा : Sambhajinagar : लग्न मंडपातून नवरदेव पोहोचला औरंगाबादच्या समर्थनार्थ आंदोलनस्थळी

दरम्यान जलील यांच्यावर ठाकरे गटाचे नेते चंद्राकंत खैरे यांनी देखील टीका केली आहे. जलील हे मुस्लीमांची मते मिळवण्यसाठी असे आंदोलन करत असल्याचे खैरेंनी म्हटले आहे. तर भाजपने आज संभाजीनगर येथे जलील यांच्या आंदोलनाच्या विरोधात आपले आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags

follow us