Download App

Ambadas Danve on BJP : ‘कर्नाटकात हनुमंताची साथ न मिळाल्याने महाराष्ट्रात औरंग्याकडे धाव’; अंबादास दानवेंचा भाजवर हल्ला

Ambadas Danve : गेल्या काही दिवसांपासून जातीय तेढ निर्माण होणाऱ्या घटना देशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर घडू लागल्या आहे. यातच या घटनांचे पडसाद आता जिल्ह्यात उमटू लागले आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ लागली आहे. यामध्ये अहमदगर शहरात औरंगजेबाचं पोस्टर झळकानवण्यात आलं होत. त्यानंतर संगमनेरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चात दोन गटांत तुफान वाद झाल्याची घटना घडली होती. कोल्हापुरात काही युवकांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चाही काढला होता. यासर्व घटनांवरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. ( Ambadas Danve Criticize BJP on Displaying Posters and Status Of Aurangzeb )

सर्वात मोठी बातमी : पवारांनी भाकरी फिरवलीचं; सुप्रिया अन् प्रफुल्ल पटेल कार्यकारी अध्यक्ष घोषित

भाजपवर टीका करताना दानवे यांनी म्हटलं की, शत्रूची भीती दाखवून मत मागण्याची भाजपची जुनी आहे. ती सवय जनता ओळखते. त्याचबरोबर ते असं देखील म्हणाले आहेत की, भाजपला कार्नाटकाच्या निवडणुकीमध्ये हनुमंताची साथ मिळाली नाही. म्हणून महाराष्ट्रात त्यांची औरंग्याकडे धाव सुरू आहे. पुढे दानवे असं देखील म्हणाले आहेत की, तुम्हाला तिटकारा असेल औरंगजेब या पापी राजाचा, तर त्याच्या कबरीला असलेला संरक्षित स्मारकाचा दर्जा काढण्याची शिफारस करणारे एक साधे पत्र तुमच्या दिल्लीश्वर दैवताला लिहिण्याची हिंमत तर दाखवा! अशी टीका दानवे यांनी भाजपवर टीका केली आहे.

Chandrasekhar Bawankule : सौरभ पिंपळकर हा BJP चा कार्यकर्ता, पण त्याने धमकी दिली नाही; बावनकुळेंचं मोठं विधान

ट्विटमध्ये काय म्हणाले दानवे?

‘बाटलीतून भूत’ बाहेर काढावे तसा हा औरंग्या सत्ताधारीच आज शिवरायांच्या महाराष्ट्रात उभा करत आहेत. शत्रूची भीती दाखवून मत मागण्याची तुमची जुनी सवय जनता ओळखते. मग तो औरंगजेब असो की पाकिस्तान. कारवाईची भाषा करणाऱ्यांनी संभाजीनगरात हे पोस्टर नामांतर आंदोलनात पहिल्यांदा दिसले तेव्हा त्यावर काय कारवाई केली, की विसर पडला तुम्हाला याचा? अल्पवयीन मुले यात सापडत आहेत. ते स्वतःचा मेंदू वापरून हे कृत्य करणे शक्य वाटत नाही. त्यांचा ब्रेनवॉश करणारी यंत्रणा कोण आहे याकडे ‘पार्टी विथ डिफ्रन्स’ जाणीवपूर्वक नजरेआड करते. मांजर डोळे मिटून दुध पिते पण तिला जग पाहत असते, हे विसरू नका. हनुमंताची साथ कर्नाटकात मिळाली नाही म्हणून महाराष्ट्रात तुमचीच धाव औरंग्याकडे सुरू आहे. स्वतःला सज्जन भासवून दुसऱ्याला दुर्जन म्हणणं फार दिवस चालत नसतं. आम्हाला तर आहेच, तुम्हाला तिटकारा असेल या पापी राजाचा, तर त्याच्या कबरीला असलेला संरक्षित स्मारकाचा दर्जा काढण्याची शिफारस करणारे एक साधे पत्र तुमच्या दिल्लीश्वर दैवताला लिहिण्याची हिम्मत तर दाखवा!

अहमदगर-कोल्हापुरातील घटना :

अहमदगर शहरातील मुकूंदनगर भागात हजरत दम्मा हरी दर्ग्यात सालाबादाप्रमाणे उरुसाचे आयोजन करण्यात आले होते. चादर अर्पण करण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी काही तरुण हातात औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचत होते. मिरवणुकीदरम्यान, शक्ती प्रदर्शन करुन “बाप तो बाप होता है, बेटा तो बेटा होता है” अशा घोषणा देऊन दोन समाजात जातीय तेढ करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संगमनेरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चात दोन गटांत तुफान वाद झाल्याची घटना घडली होती. कोल्हापुरात काही युवकांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चाही काढला होता.

Tags

follow us