Download App

Amol Kolhe : ‘बेळगाव’चा ‘बेळगावी’ असा उल्लेख, सीमाभागातील मराठी लोक आक्रमक

  • Written By: Last Updated:

पाच तारखेला बेळगावच्या राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे, या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना आमंत्रण दिले होते. त्या कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी अमोल कोल्हे यांनी एक व्हिडीओ जाहीर केला होता. त्यामध्ये बेळगावचा उल्लेख बेळगावी असा केला होता. त्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीने अमोल कोल्हेंवर टीका केली आहे. सोबत सीमाभागातून अमोल कोल्हेंबाबत आक्रमक प्रतिक्रिया येत होत्या.

एकीकरण समितीच्या आक्रमक पावित्र्यानंतर  अमोल कोल्हेंनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आपल्याकडून अनावधानाने बेळगावचा उल्लेख बेळगावी असा झाला, असं स्पष्टीकरण कोल्हेंनी दिलं आहे. त्यासंदर्भातला एक व्हिडीओ अमोल कोल्हे यांनी आपल्या सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, “येत्या पाच तारखेला बेळगावच्या राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आहे, असं मला सांगण्यात आलं. त्यामुळे या कार्यक्रमाला येत होतो. पण, निपाणीमध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याला जात असताना, घाईत या कार्यक्रमाबद्दल बोलताना बेळगावचा माझ्याकडून चुकीचा उल्लेख झाला. याबाबत मराठी बांधवांच्या भावना दुखावल्या असतील. त्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो.”

कार्यक्रमाला जाणंही टाळलं

यांनतर अमोल कोल्हे यांनी या कार्यक्रमाला जाणंही टाळलं आहे. अमोल कोल्हे यांनी आपल्या व्हिडीओ मध्ये म्हटले आहे की सीमाभागातील लोकांनी या कार्यक्रमाची पार्श्वभूमी मला सांगितली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला जाणार नाही, असं त्यांनी सांगितले आहे. सीमाभागातील लोकांची मागणी न्याय असून मी त्यांच्या पाठीशी आहे, असंही अमोल कोल्हे यांनी आपल्या व्हिडीओ मध्ये म्हंटले आहे.

Tags

follow us