Amravati Viral Video Case registered against the youth under POCSO : राज्यामध्ये नाशिक शहर गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या विळख्यात सापडलं आहे. अशोक खरात ते आता आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराचे प्रकरण त्यानंतर आता अमरावतीमध्ये देखील असच लैंगिक शोषणाचं धक्कादायक प्रकरणं समोर आलं आहे. अमरावतीतील परतवाडा-अचलपूर या शहरांमध्ये अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणाने खळबळ उडाली आहे. यामध्ये तब्बल 180 तरुणींचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप करण्यात आला असून यामध्ये थेट भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्या तक्रारीवरून 19 वर्षीय तरुणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-अचलपूर या शहरांमध्ये इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवर तरुणींचे आणि महिलांचे काही अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर या प्रकरणात आरोपीने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित केले आणि त्याचे चित्रिकरण करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
दबाव सहन करणार नाही; नाशिक टीसीएस लैंगिक शोषणावर अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचं स्पष्टीकरण
त्याचबरोबर भाजपा आमदार प्रवीण तायडे यांनी याबाबत तक्रार दिली असून भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी या प्रकारात दावा केला आहे की, यामध्ये तब्बल 180 पिडीत महिलांचं लैंगिक शोषण करण्यात आलं आहे. तसेच साडेतीनशेहून अधिक व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. परभणी प्रकरणामध्ये एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तसेच हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपी युवक कुटुंबासह फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या दरम्यान नाशिकमध्ये अशोक खरात आयटी कंपनीतील लैंगिक शोषण्याची प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे.
