Download App

लवकरच मंत्रिमंडळ विस्तारासह महिला मंत्री दिसेल : अमृता फडणवीस

पुणे : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं काम चांगलं सुरु असून सगळं सुरळीत चालू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांनाही अनुभव आहे. त्यांना माहीत आहे की, मंत्रिमंडळात कोण आहे कोण नाही. ते लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करतील आणि मंत्रिमंडळात महिला मंत्री दिसणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी पुण्यात पत्रकारांसोबत विविध विषयांवर संवाद साधला.

यावेळी पत्रकारांनी विचारलं की, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचं सरकार फेब्रुवारी महिन्यात पडेल असं म्हटलं होतं, त्यावर अमृता फडणवीस यांनी भाष्य केलंय. सरकारचं काम चांगलं सुरु असून सगळं सुरळीत चालू आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना अनुभव आहे. त्यामुळे चांगले निर्णय घेतले जात आहेत, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कोण नाही कोण आहे, त्यांना चांगलं माहिती आहे. लवकरच राज्यसरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करतील, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र राज्याला सुजलाम सुफलाम करावं, महाराष्ट्र आर्थिक, सांस्कृतिक स्तरावर जगभरात पहिल्या क्रमांकावर यावं, यासाठी त्यांनी काम करावं, असं वाटत असल्याचं अमृता फडणवीस म्हणाल्या.

Tags

follow us