उर्फी व चित्रा वाघ वाद प्रकरणावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया…

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र आता सध्या उर्फी व भाजप नेत्या चित्र वाघ यांच्यात वाद पेटला आहे. यावर वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. यातच या प्रकरणात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. उर्फी एक स्त्री म्हणून जे काही करतेय, त्यात मला काहीही […]

Untitled Design (15)

Untitled Design (15)

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र आता सध्या उर्फी व भाजप नेत्या चित्र वाघ यांच्यात वाद पेटला आहे. यावर वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. यातच या प्रकरणात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे.

उर्फी एक स्त्री म्हणून जे काही करतेय, त्यात मला काहीही वावगं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीसांनी दिली. दरम्यान चित्रा वाघ यांनी उर्फीच्या तोकड्या कपड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. उर्फीला असं कमी कपड्यात रस्त्यावर फिरू देणार नाही, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली.

चित्रा वाघ यांच्या प्रतिक्रियेनंतर आता उर्फीनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिल आहे. डीपी मेरा धासू, चित्रा वाघ मेरी सासू” अशी शब्दांत उर्फीने चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
चित्रा वाघ यांनीही याबाबत भूमिका मांडली आहे की, काहींची व्यावसायिक गरज असते, त्यांना त्याप्रकारचे सीन करावे लागतात. पण तुम्ही केवळ प्रकाशझोतात राहण्यासाठी रस्त्यावर तसं फिरत असाल, तर ते ठीक नाहीये. उर्फी एक कलाकार आहे, पण सार्वजनिक ठिकाणी जाताना संस्कृती जपली पाहिजे. तुमचं व्यवसायिक आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य वेगळं असतं.

याबाबत प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. चित्रा वाघ यांचे जे विचार होते, ते त्यांनी प्रकट केले आहेत. त्यानुसार त्या कारवाई करत आहेत. माझा विचार असा आहे की, उर्फीने जिथे फ्रोफेशनली कमेंटमेंट नाही. तिथे संस्कृतीच्या हिशोबाने राहिलं तर चांगलं आहे. बाकी मला वैयक्तिक सांगायचं झालं तर… उर्फीही एक स्त्री आहे, ती जे काही करतेय. ते ती स्वत:साठीच करत आहे. त्यामध्ये मला काहीही वावगं वाटत नाही.

Exit mobile version