Download App

सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार; Amul Milk दरात लिटरमागे 3 रुपयांची वाढ

सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. या महागाईच्या काळात अमूल कंपनीने दुधाच्या (Amul Milk) दरात वाढ केली. आता अमूलचे दूध खरेदी (Price) करण्यासाठी प्रतिलिटर ३ रुपये (Hike) अधिक मोजावे लागणार आहेत. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, अमूलने सर्व प्रकारच्या पॅक्ड दुधाच्या किमती प्रति लिटर ३ रुपयांनी वाढवल्या आहेत.

३ फेब्रुवारीपासून दुधाचे नवे दर लागू होणार आहेत. याअगोदर मदर डेअरीने डिसेंबरमध्ये दुधाचे दर वाढवले ​​होते. या दरवाढीनंतर अमूल गोल्ड ६६ रुपये प्रति लिटर, अमूल फ्रेश ५४ रुपये प्रति लिटर, अमूल गायीचे दूध ५६ रुपये आणि अमूल म्हशीचे दूध ७० रुपये प्रति लिटर महागले आहे.

गेल्या १० महिन्यांत दुधाच्या दरात १२ रुपयांनी वाढ झाली. याआधी सुमारे ७ वर्षे दुधाचे भाव वाढले नव्हते. एप्रिल २०१३ ते मे २०१४ दरम्यान दुधाचे दर प्रतिलिटर 8 रुपयांनी वाढले. उन्हाळ्यात दूध उत्पादन कमी होते. यामुळे दूध कंपन्यांना पशुपालकांना जादा भाव द्यावा लागत असतो. यामुळे आगामी काळात दुधाच्या दरात वाढ होण्याची अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली.

दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला दूध विक्रेत्या मदर डेअरीने दिल्ली-एनसीआर भागात विकल्या जाणाऱ्या दुधाच्या दरात प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ केली. मदर डेअरीने गेल्या वर्षी दुधाच्या दरात पाचव्यांदा वाढ केली होती.

Tags

follow us

वेब स्टोरीज