Video : आजींनी केली गंमतीशीर मागणी; खासदार सुप्रिया सुळेंना हसू आवरेना

घोडके आजींना तुमचा आवडता राजकारणी कोण? हे विचारल्यावर त्यांनी थेट माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरूंचं नाव घेतलं आहे.

Sulle Aaji

Sulle Aaji

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीच्या (Sule) खासदार सुप्रिया सुळेंकडं आज वेगळच प्रकरण तक्रारीसाठी गेल्याचं पहायला मिळाल. एका आजीबाईंची तक्रार ऐकून सुप्रीया सुळेंनाही हसू आवरता आलं नव्हतं. विशेष म्हणजे, सुप्रिया सुळेंनी आजीबाईंची तक्रार ऐकून घेतली आणि तुमच्या मागणीचा विचार नक्की करते, असं आश्वासनही आजीबाईंना दिलं आहे. कुसुम घोडके असं या आजींचं नाव असून त्यांचं वय 80 वर्ष आहे.

म्हातारपणी काय करावं? तर मालिका बघायच्या. मात्र, याच मालिकांच्या ब्रेकमध्ये जाहिराती दाखवतात. मग त्या जाहिराती का बघायच्या? त्यावर तोडगा काढा, अशी आगळी-वेगळी मागणी आजींनी सुप्रीया सुळेंकडं अगदी निरागसपणे केली आहे. आता मालिकांमध्ये हेवे-दावे दाखवतात, ते आधी बंद करा. कुरघोडी करणारे व्हिलन दाखवता, ते सुद्धा बंद करा, असं म्हणत आजीनं थेट मालिकांच्या दिग्दर्शकांना आणि प्रोड्यूसर्सना खडसावलं आहे.

घायवळ आणि भाजपची मिडिया! रविंद्र धंगेकरांचा हल्लाबोल, पत्रकार परिषदेत थेट नावंचं घेतले

घोडके आजींना तुमचा आवडता राजकारणी कोण? हे विचारल्यावर त्यांनी थेट माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरूंचं नाव घेतलं आहे. तसंच, आताच्या राजकारण्यांबद्दल बोलताना राज ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केला आहे. राज ठाकरेंच्या आवाजात दम आहे पण त्यांच्या पाठीशी कोणी नसतं, असं म्हणत आजींनी राज ठाकरेंबाबतदेखील मत व्यक्त केलं आहे. टीव्ही सीरियलमधल्या जाहिराती कमी करा, अशी गंमतीशीर मागणी करणाऱ्या आजीबाईंचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला.

आम्ही म्हातारी माणसं घरी टीव्ही बघतो. एवढे पैसे भरायचे आणि जाहिरातीच पाहत बसायच्या. काय बघायचं सांगा? दहा मिनिटांचा कार्यक्रम असतो. बाकीची वीस मिनिटं जाहिरातीच. कुठे तक्रार करु हेच मला समजेना, योगायोगाने तुम्ही आलात, त्यामुळे मला जरा बरं वाटलं, त्याच्यावर तुम्हाला काहीतरी करता आलं तर बघा. थोडी मेहरबानी होईल. कारण आमचा वेळ जात नाही. नुसता वैताग आणलाय. खरंच सांगते असंही त्या आज्जी म्हणाल्या आहेत.

Exit mobile version